maharashtra cabinet ministers list महायुतीचं ठरलं ! गृह, महसूल, पर्यटन ते महसूल, नगरविकास…; कोणाला कोणती खाती मिळणार, संभाव्य यादी समोर

maharashtra cabinet ministers list राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. 15 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेलं नाही. परंतु, महायुती सरकारचं खातेवाटप ठरल्याची माहिती समोर आली आहे. आगामी 24 तासांमध्ये खातेवाटप संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेची यादी काल रात्रीच देण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेसची यादी आज सादर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांत राज्यपालांना संपूर्ण खातेवाटपाची यादी खाते देणार आहे. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

maharashtra cabinet ministers list कसे असणार खाते वाटप?

खातेवाटपाची माहिती: भाजपकडे मुख्यत्वे गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा खाती राहणार आहेत. यामुळे भाजपच्या गटाला महत्त्वाची भूमिका मिळणार आहे. शिवसेनेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं जाणार आहे. यामुळे राज्यातील शहरी विकास व गृहनिर्माण योजनांवर शिवसेनेचा प्रभाव राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ आणि महिला व बालविकास खाती जाणार असल्यामुळे त्यांचा प्रभाव अर्थविषयक निर्णयांवर राहील.

maharashtra cabinet ministers list महत्वाचं म्हणजे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महिला व बालविकास खातं देखील मिळणार आहे. आदिती तटकरे यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे राष्ट्रवादीकडे महिलांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची भूमिका असणार आहे.

हे वाचा: लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी!

खातेवाटपाची रचना: गेल्या मंत्रीमंडळातील महत्त्वाची खाती त्या-त्या पक्षाच्या ताब्यात राहणार आहेत.

  • भाजप कडे गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा खाती राहणार आहेत.
  • शिवसेने कडे नगरविकास व गृहनिर्माण खाती जाणार आहेत.
  • राष्ट्रवादी काँग्रेस कडे अर्थ व महिला व बालविकास खाती जाणार आहेत. तसेच, उत्पादन शुल्कही राष्ट्रवादीला मिळणार आहे.

कॅबिनेटमंत्री:

  1. चंद्रशेखर बावनकुळे
  2. राधाकृष्ण विखेपाटील
  3. हसन मुश्रीफ
  4. चंद्रकांत पाटील
  5. गिरीश महाजन
  6. गुलाबराव पाटील
  7. गणेश नाईक
  8. दादा भुसे
  9. धनंजय मुंडे
  10. संजय राठोड
  11. मंगलप्रभात लोढा
  12. उदय सामंत
  13. जयकुमार रावळ
  14. पंकजा मुंडे
  15. अतुल सावे
  16. अशोक उईके
  17. शंभूराज देसाई
  18. आशिष शेलार
  19. दत्ता भरणे
  20. आदिती तटकरे
  21. शिवेंद्रसिंह भोसले
  22. माणिकराव कोकाटे
  23. जयकुमार गोरे
  24. नरहरी झिरवळ
  25. संजय सावकारे
  26. संजय शिरसाठ
  27. प्रताप सरनाईक
  28. भारत गोगावले
  29. मकरंद पाटील
  30. नितेश राणे
  31. आकाश फुंडकर
  32. बाबासाहेब पाटील
  33. प्रकाश आबिटकर

राज्यमंत्री:

  1. माधुरी मिसाळ
  2. आशिष जयस्वाल
  3. पंकज भोयर
  4. मेघना बोर्डीकर साकोरे
  5. इंद्रनील नाईक
  6. योगेश कदम

maharashtra cabinet ministers list मंत्रिपदाची शपथ घेणारे मंत्री आणि खातेवाटपाची यादी येत्या काही तासांत अधिक स्पष्ट होईल.

1 thought on “maharashtra cabinet ministers list महायुतीचं ठरलं ! गृह, महसूल, पर्यटन ते महसूल, नगरविकास…; कोणाला कोणती खाती मिळणार, संभाव्य यादी समोर”

Leave a comment