Maharashtra cm महाराष्ट्राचे नवीन सरकार शपथविधीची निमंत्रण पत्रिका जारी, कोण कोण शपथ घेणार?

Maharashtra cm विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मागील 10 दिवस पासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहे . पण मात्र, मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट झालेले नव्हते. पण आता मुख्यमंत्री कोण होणार ? हे स्पष्ट झालेले आहे. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली आहे.या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची सर्व आमदारांनी गटनेतेपदी एकमताने निवड केली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची देखील महत्त्वाची भूमिका राहील, असे स्पष्ट झाले आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Maharashtra cm शपथविधीचा भव्य सोहळा

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री(Maharashtra cm) म्हणून शपथ घेणार आहेत. फडणवीस व शिवसेना (शिंदे) पक्षप्रमुख तथा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) यांनी राजभवनावर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे.आज (५ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानात महायुतीच्या नेत्यांचा शपथविधी पार पडेल.

दरम्यान, या शपथविधीची निमंत्रण पत्रिका समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहे . ही निमंत्रिका देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केलेली आहे. यावर असे लिहिलेले आहे की देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तसेच उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, मुंबईतील आझाद मैदानावर आझाद मैदान, फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी आपण कृपया उपस्थित रहावे , ही विनंती. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधीची अधिकृत निमंत्रण पत्रिका जारी केली आहे. या पत्रिकेनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांचे शपथविधी होणार आहेत.

महायुती सरकार: प्रमुख नेते आणि त्यांची भूमिका

  1. देवेंद्र फडणवीस (भाजपा):
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार. यापूर्वीही मुख्यमंत्री म्हणून यशस्वी कामगिरी केलेल्या फडणवीस यांना पुन्हा एकदा नेतृत्वाची संधी मिळाली आहे.
  2. एकनाथ शिंदे (शिवसेना-शिंदे गट):
    विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवीन सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका सांभाळणार आहेत. फडणवीसांनी शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची विनंती केली असून, शिंदेंनी त्यास सहमती दर्शवली आहे.
  3. अजित पवार (राष्ट्रवादी):
    उपमुख्यमंत्रीपदावर शपथ घेण्याची शक्यता आहे. महायुतीच्या सत्तेत राष्ट्रवादीच्या भूमिकेला महत्त्व असेल.

फडणवीसांचे वक्तव्य: “एकत्र जबाबदारी सांभाळणार”

पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी सांगितले की, “आमची पदं तांत्रिक असली तरी आम्ही तिघेही मिळून राज्याची जबाबदारी सांभाळू. महाराष्ट्राला एक उत्तम सरकार देण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

शपथविधी: महत्त्वाचा राजकीय टप्पा

Maharashtra cm हा शपथविधी महायुतीच्या सत्तेचा नव्या पर्वाचा प्रारंभ मानला जात आहे. या सोहळ्याला महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती राहील.

महायुती सरकारकडून राज्याच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी निर्णय अपेक्षित आहेत. त्यामुळे नव्या सरकारकडून महाराष्ट्राला कोणते धोरणात्मक बदल मिळतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Maharashtra cm

Leave a comment