Maharashtra Election Results 2024 कोणाला मिळाली सर्वाधिक मते.

Maharashtra Election Results 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: महायुतीचा दिमाखदार विजय

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालांनी राज्याच्या राजकारणात एक ऐतिहासिक वळण निर्माण केले आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने एकत्रितपणे महायुतीच्या माध्यमातून मोठा विजय मिळवण्याची वाटचाल केली आहे.

Maharashtra Election Results 2024 मतदान आणि महत्त्वाची माहिती

  • मतदानाची टक्केवारी: या निवडणुकीत 20 नोव्हेंबर 2024 रोजी 65.11% मतदान झाले.
  • महायुतीची आघाडी: 288 जागांपैकी सुमारे 200+ जागांवर महायुतीने आघाडी घेतली आहे.
  • महा विकास आघाडीला धक्का: काँग्रेस राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या निवडणुकीत खूप मोठा धक्का बसला आहे.

प्रमुख नेत्यांचे निकाल

  • देवेंद्र फडणवीस (भाजप): नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघ, 39710 मतांनी विजयी.
  • एकनाथ शिंदे (शिवसेना): कोपरी-पचपखाडी मतदारसंघातून 1,20,717 मतांनी दिमाखदार विजय.
  • अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस): बारामती मतदारसंघातून 1,00,899 मतांनी विजय मिळवण्याच्या मार्गावर.
  • आदित्य ठाकरे (शिवसेना उद्धव गट): वर्ली मतदारसंघातून काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना 8,801 मतांनी पराभूत केले.
  • सर्वाधिक मतांनी निवडून आले: सातारा मतदार संघ भाजपचे उमेदवार शीवेद्र राजे भोसले 142124 एवढ्या मतांनी निवडून आले. (राज्यातील सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा त्यांनी मान मिळवला आहे.)
  • परळी :मतदार संघातून धनंजय मुंडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) हे 140224 एवढ्या मतांनी विजयी ठरले आहेत.
  • पहिला निकाल: वडाळा मतदारसंघात भाजपचे कालिदास नीलकंठ कोलंबकर यांनी शिवसेना (उद्धव गट) च्या श्रद्धा जाधव यांना 24,973 मतांनी पराभूत केले.

राजकीय चित्र बदलणारे निवडणुकीचे परिणाम

ही निवडणूक महाराष्ट्रातील मतदारांच्या बदलत्या विचारसरणीचे आणि राजकीय समीकरणांचे प्रतीक ठरली आहे. महायुतीच्या मोठ्या विजयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाला बळकटी मिळाली आहे.
महा विकास आघाडीला या निवडणुकीत मोठा झटका बसल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील वाटचाल महत्त्वाची ठरणार आहे.

Maharashtra Election Results 2024

Maharashtra Election Results 2024 निष्कर्ष

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 हे राज्याच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व ठरले आहे. महायुतीचा विजय केवळ राजकीय यश नसून मतदारांच्या अपेक्षांची पूर्तता करणारे नेतृत्व राज्याला मिळाल्याचा स्पष्ट संकेत आहे. अंतिम निकाल जाहीर होताच याबाबत अधिक माहिती समोर येईल.

Leave a comment