Maharashtra Rain : गेल्या आठवडाभर राज्यात पावसाचे प्रमाण कमी असले, तरी आता लवकरच पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढील 5 दिवस विदर्भ, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.Maharashtra Rain

आजचा आणि उद्याचा हवामानाचा अंदाज
आज (सोमवार): विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच, दक्षिण मराठवाड्यातील सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. उर्वरित मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हलक्या पावसाचा अंदाज आहे.
उद्या (मंगळवार): विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. कोकण, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर (अहिल्यानगर), बीड आणि जालना जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.Maharashtra Rain
पुढील 3 दिवसांचा अंदाज
बुधवार: विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
गुरुवार: विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड आणि हिंगोली, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातही पाऊस पडेल. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
शुक्रवार: या दिवशी विदर्भात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही निवडक जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.Maharashtra Rain
या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.