Maharashtra Weather :विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट; राज्यात कुठे कुठे धो धो बरसणार ?

Maharashtra Weather: महाराष्ट्र राज्य मध्ये मागील काही दिवसापासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. आजही राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता देण्यात आली आहे. मान्सून पूर्व पावसाने काल (मंगळवारी) महाराष्ट्राला चांगले झोडपले आहे.

पुणे मुंबई राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस , वारा ,गारपीट झाली असून आजही राज्यात वादळी वारा यासह मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर, कोकण ,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता देण्यात आली आहे मुंबई ,ठाणे ,पालघर आणि रायगड ला यलो अलर्ट देण्यात आला असून पुण्यात आज (बुधवारी) ऑरेंज अलर्ट दर्शवण्यात आला आहे.Maharashtra Weather

Maharashtra Weather

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

सध्या वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. कमीत कमी तापमानातील वाढ, चटकदार ऊन, तसेच उकाडा तापदायक ठरत आहे .अशा या वातावरणामुळे वादळी पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे .आजही राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे .तर उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे .यामुळे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे .Maharashtra Weather

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
20250730 070716 PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:

हे वाचा : राज्यभरात 2 दिवस ऑरेंज अलर्ट; मान्सून भारताच्या सीमेवर ,पहा काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

राज्यात आज (बुधवारी) कुठे कुठे कोणता अलर्ट दिला ?

राज्यात आज 21 मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .विशेषता: कोकण आणि घाटमाथ्यावर .

ऑरेंज अलर्ट कुठे?

हे पण वाचा:
new rule ration card रेशन कार्ड आणि गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल: new rule ration card

राज्यात आज(बुधवारी) या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे . यामध्ये सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट .

यलो अलर्ट कुठे?

राज्यामध्ये आज या जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये विशेषता: मुंबई, पालघर रायगड ठाणे नंदुरबार जळगाव धुळे नाशिक जालना हिंगोली नांदेड परभणी लातूर बुलढाणा अकोला यवतमाळ अमरावती वर्धा वाशिम नागपूर भंडारा या जिल्ह्यांसाठी यलोअलर्ट देण्यात आला आहे .Maharashtra Weather

हे पण वाचा:
20250724 070246 लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! आता ‘या’ लाखो महिलांना मिळणार नाही लाभ.

राज्यात पुढील 3 दिवस धो धो पाऊस बरसणार

राज्यात मागच्या काही दिवसापासून प्री – मान्सून पावसात सुरुवात झाली आहे .सध्या हा पाऊस महाराष्ट्र राज्यामध्ये वादळी वारे आणि ढगांच्या कडकडाटसह होत आहे .वाऱ्याचा वेग हा ताशी 50 ते 60 पन्नास किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो .यामुळे काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस असाच असणार आहे .यामध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेषता: सिंधुदुर्ग ,रत्नागिरी, कोल्हापूर , सातारा,सांगली आणि पुणे जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे .हवामान विभागाकडून दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात साठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे .या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.Maharashtra Weather

हे पण वाचा:
Maharashtra Rain Maharashtra Rain :राज्यातील या जिल्ह्यांना पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा!

Leave a comment