Maharashtra Weather Update : मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यांमध्ये मागील 24 तासांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातही ही स्थिती अशीच कायम राहणार आहे, पुढील पाच दिवसांमध्ये राज्यात विविध भागांमध्ये पावसाची हजेरी असणार आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे .
मान्सूनच आगमनासाठी अरबी समुद्रात पूरक परिस्थिती निर्माण होत असतानाच देशांमध्ये आता मान्सून पूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावण्या सुरुवात केली आहे पण मात्र हा पाऊस महाराष्ट्र राज्यामध्ये आत्तापासूनच धुमाकूळ घालताना दिसत आहे. तसेच आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात वारे, विजांच्या कडकडाट सह वादळी पावसाची हजेरी असेल असा इशारा देण्यात आला आहे. विशेषता; नाशिक, अहिल्यानगर, सातारा, पुणे, कोल्हापूर या भागांमध्ये जोरदार वादळी पाऊस होणार आहे असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि कोकण पट्टा येथे सुद्धा पाऊस होणार आहे.Maharashtra Weather Update.

हवामान विभागाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने राज्यात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाट सह राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे . या दरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भामध्येही तुरळक ठिकाणी पाऊस जोरदार होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये गुजरात आणि उत्तर कोकणाच्या किनाऱ्या लगत अरबी समुद्रात चक्रकार वारी वाहत आहेत. याच वाऱ्याची दिशा आणि त्याचा वेग पाहताच याची परिणाम सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होत असताना दिसत आहे. हा पाऊस आणि या पावसाचे वातावरण पाहून पाठ सोडणार नसून कमीत कमी 21 मे पर्यंत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. Maharashtra Weather Update
हे वाचा : या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! वादळी वारे आणि गारपीट,आज कोण-कोणत्या भागात पाऊस पडणार?
राज्यात अवकाळी संकट
राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाने चांगलं झुडपण काढला आहे. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना पाहायला मिळत आहे. ही संकट राज्यावर आणखीन काही दिवस टिकून राहणार असून, हवामान विभागाने पुणे शहरासह जिल्ह्यातील आणि राज्यातील घाट परिसरात पुढील 2 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे . काही भागांमध्ये धो-धो पाऊस वारे,ढगांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे .तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे .Maharashtra Weather Update