Maharashtra Weather Update : राज्यभरामध्ये मान्सून पूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे .विविध जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येत असून .पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे .आता मान्सून भारताच्या उंबरठ्याजवळ येऊन ठेपला आहे .यामुळे तो केरळात कधीही दाखल होऊ शकतो .केरळ बरोबरच तमिळनाडू राज्यालाही आगामी तीन दिवसात अतिवृष्टीचा इशारा वर्तवण्यात आला आहे .दरम्यान काल (सोमवारी) राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहे .आज 20 मे रोजी राज्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर उद्या 21 मे रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .नागरिकांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे .Maharashtra Weather Update

येत्या काही तासात केरळमध्ये मान्सून दाखल
यावर्षी मान्सून ने अपेक्षेपेक्षाही खूप वेगाने वाटचाल सुरू केली आहे .मान्सून ने 19 मे रोजी श्रीलंका ओलांडून अरबी समुद्रातून भारताच्या दिशेने प्रचंड वेगाने सरकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाने केळ आणि तमिळनाडू सह किनारपट्टीवरील राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे .20 मे रोजी भारतीय किनारपट्टी साठी रेड अलर्ट दर्शवण्यात आला आहे .यामुळेच तर मान्सून केरळमध्ये काही तासातच प्रगट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .या अगोदर हवामान विभागाने मान्सून 27 मे रोजी दाखल होईल,असा अंदाज देण्यात आला होता. परंतु वेगाने मान्सून सरकत असल्यामुळे दक्षिण भारतासह संपूर्ण देशभरात हवामानामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे .Maharashtra Weather Update
हे वाचा : तुम्हाला घर मंजूर झालं आहे की नाही? कसं चेक करणार? जाणून घ्या…
कोकण भागास 21 मे रोजी (उद्या) रेड अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीला उद्या(बुधवारी)21 मे रोजी रेड अलर्ट दर्शवण्यात आला असून, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाडा,व उत्तर महाराष्ट्राला दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे .हा पाऊस 22 मे पर्यंत राहणार असून 23 मे नंतर या पावसाला ब्रेक लागणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे .Maharashtra Weather Update
मान्सून चे लवकरच आगमन होण्याची शक्यता
यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा लवकरच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे .हवामान विभागाने मान्सून 21 ते 22 मे दरम्यान केरळमध्ये पोहोचणार आहे असे संकेत देण्यात आले आहेत .सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जर मान्सून 20 मे अगोदर केरळमध्ये दाखल झाला ,तर तो मागील 100 वर्षातील सर्वात लवकर दाखल झालेला मान्सून ठरेल .यापूर्वी सर्वात लवकर मान्सून केरळमध्ये 28 मे रोजी दाखल झाला असल्याची नोंद आहे. दरम्यान आता महाराष्ट्र मध्ये हीवातावरणात खूप मोठा बदल जाणवू लागले आहे .त्याच्यावर उच्च स्तरावरील चक्रीय वाऱ्यांचे परिसंचारण तयार झाले आहे .यामुळे तर अद्रितेत वाढ होत आहे .याचे परिणाम म्हणून पुणे जिल्हा आणि विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे .
घाटमाथा परिसरात सतर्कतेचा इशारा
पुढील 4 ते 5 दिवस तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस होणे शक्यता देण्यात आली आहे विशेषता: हा पाऊस पुणे , सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी जोरदार होण्याची शक्यता आहे .यामुळे हवामान विभागाने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे .21 मे ते 23 मे दरम्यान घाट भागात प्रवास टाळण्याचे आव्हान नागरिकांना देण्यात आली आहे .या काळामध्ये कमी दृश्यमानात, ओले व घसरडे रस्ते,तात्पुरते पूरस दृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.यामुळे या भागामध्ये जाण्यास टाळले पाहिजे .हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याची आव्हान केले आहे तसेच,प्रशासनालाही योग्य त्या उपयोजना करण्याचे निर्देशदेण्यात आले आहे .Maharashtra Weather Update
या जिल्ह्यांना पुढचे 48 तास यलो अलर्ट
राज्यातील या जिल्ह्यांना पुढचे 48 तास यलो अलर्ट देण्यात आला आहे .यामध्ये पुणे ,अहिल्यानगर सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशीव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Maharashtra Weather Update