PM Awas Yojana : पीएम आवास योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे .या योजनेच्या माध्यमातून बेगर नागरिकांना घरकुलासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे .जर तुम्ही पीएम आवास (PM Awas Yojana) योजना साठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे .
पीएम आवास (PM Awas Yojana) योजनेअंतर्गत ला बघितला आहे आणि पुढील काळातही या योजनेच्या माध्यमातून देशभरातील करोडो नागरिकांना लाभ मिळेल अशी आशा आहे .महाराष्ट्र राज्य मध्ये ही योजना सुरू आहे आणि या योजनेअंतर्गत बेघर नागरिकांना घरकुल उपलब्ध होत आहे .

या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे विशेषता: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना जास्तीत जास्त या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जात आहे .पण मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न मर्यादा आणि काही अटी ,पात्रता लागू करण्यात आलेले आहेत .PM Awas Yojana
हे वाचा : घरकुल सर्वेसाठी मिळाली मुदतवाढ आता या तारखेपर्यंत करता येणार सर्वे..!
या योजनेअंतर्गत 92.61 लाख घरे पूर्ण
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, आतापर्यंत या योजनेअंतर्गत 92.61 लाख घरे पूर्ण करण्यात आली आहेत . प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी अशा दोन्ही भागांमधील गरजू नागरिकांना घरे वितरित केली जातात परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पक्के घर नसले पाहिजे .
जर तुम्ही पीएम आवास योजनेचा अर्ज केला असेल तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की, तुमचं नाव लाभार्थी यादी मध्ये आहे की नाही ? ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तपासता येणार आहे .PM Awas Yojana
तुम्हाला घर मंजूर झाले आहे की नाही, असे करा चेक?
- जर तुम्ही पीएम आवास योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तपासायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम PMAY च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- https://pmaymis.gov.in/ ही पीएम आवास योजनेची अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जावे लागेल.
- यासाठी तुमच्याकडे सर्वप्रथम Assessment नंबर असला पाहिजे
- जर हा नंबर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन Menu मध्ये जाऊन तिथे Citizen Assessment या पर्यावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तेथे Search by Name, Mobile No . इत्यादी दोन पर्याय दिसतील तुम्हाला या दोन पर्याय पैकी Search by Name या पर्यावर क्लिक करायचे आहे .
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागणार आहे.
- तेथे तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, शहर, अर्जदाराचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल नंबर अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला तेथे भरावी लागणार आहे .
- सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे .
- सबमिटया बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दाखवली जाणार आहे .
जर तुमच्याकडे Assessment नंबर असेल तर अशी करा अर्जाची स्थिती चेक
- जर तुम्ही पीएम आवास योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला जाणून घ्यायच असेल तर तुम्ही फक्त दोन मिनिटात असेसमेंट (Assessment) या नंबरच्या साह्याने तुम्ही अर्जाची स्थिती चेक करू शकतात.
- जर तुमच्याकडे हा Assessment नंबर असेल तर तुम्ही सर्वप्रथम पीएम आवास योजनेच्या अधिकृत https://pmaymis.gov.in/ वेबसाईटवर जावे लागेल.
- पीएम आवास योजनेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर मग मेनू मध्ये जा आणि Citizen Assessment मध्ये जाऊन Assessment ID चा पर्याय निवडून घ्या.
- हा पर्याय निवडल्यानंतर मग तुमचा Assessment नंबर व मोबाईल नंबर टाकून घ्या.
- Assessment नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर सबमिट ( Submit) या बटनावर क्लिक करा.
- अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही याची माहिती सविस्तर पणे पाहता येईल.PM Awas Yojana