Mahila Samman Bachat Yojana :महिलांसाठी सूचना!1 एप्रिल पासून त्या योजनेचा लाभ मिळणार नाही, महत्त्वाचे अपडेट…पुढे काय?

Mahila Samman Bachat Yojana : मागील दोन ते तीन वर्षापासून गरीब ,तरुण, शेतकरी आणि महिला यांच्यावर मोदी सरकार सातत्याने काम करत आहे . त्यांच्या भल्यासाठी त्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना या देशांमध्ये राबवत आहे. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे महिला सम्मान बचत योजना (MSSC). मात्र, ही योजना 1 एप्रिल 2025 पासून बंद होणार आहे. त्यामुळे या योजनेत आता नवीन गुंतवणूक करता येणार नाही . महिला सम्मान बचत योजनेत 7.5% आकर्षक व्याजदर मिळत होता.

Mahila Samman Bachat Yojana

Mahila Samman Bachat Yojana म्हणजे काय?

ही योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केली होती 1 एप्रिल 2023 पासून सुरू झालेल्या या योजनेत महिलांना आणि लहान मुलींसाठी सुरक्षित गुंतवणुकीची संधी देण्यात आली होती. या योजनेचा लाभ फक्त महिलांसाठीच आहे . या योजनेत 31 मार्च 2023 पासून महिला व लहान मुलीच्या नावे खाते उघडण्यास सुरुवात झाली होती. योजनेअंतर्गत महिलांना आकर्षक व्याजदरासह निश्चित रक्कम मिळण्याची हमी होती.

हे वाचा : व्यवसाय सुरू करायचा आहे! तर या सरकारी स्कीम अंतर्गत मिळतंय 10 लाखांचं कर्ज ते पन कमी व्याजदरावर .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

कुठे आणि कसे उघडता येते खाते?

या योजनेत (Mahila Samman Bachat Yojana) महिला अथवा लहान मुलींच्या नावे पालकांना खाते उघडता येत होते या योजनेनुसार 31 मार्च 2023 पासून दोन वर्षासाठी खाते उघडता येत होते. या योजनेत गुंतवणूकदाराना प्रकारचे खाते उघडता येत होते. महिला सन्मान सेविंग सटिफिकेट योजनेत खाते पोस्ट ऑफिस अथवा बँकेत खाते उघडण्याची सोय होती .

Mahila Samman Bachat Yojana योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंतची मर्यादा

या योजनेत गुंतवणूकदारांना 7.5 पिके निश्चित व्याज देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत महिला किंवा लहान मुलीच्या नावे दोन लाख रुपये पर्यंत ठेव ठेवता येत होती. या योजनेत कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करता येत होते. वार्षिक व्याज तिमाहीत जमा होत होते.

या योजनेअंतर्गत जर तुम्ही दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पहिल्या तिमाहीत या रकमेवर 3,750 रुपयाची व्याज मिळेल . दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी या रकमेवर दुसऱ्या गुंतवणुकीवर 3,820 रुपये व्याज मिळेल . या योजनेतील लाभार्थ्यांना दोन वर्षानंतर एकूण 2,32,044 रुपये मिळतील . पण कोणत्याही आर्थिक वर्षात या योजनेतील व्याजाचा आकडा 40 हजार रुपये पेक्षा अधिक असेल तर कलम 194 ए अंतर्गत देण्याची तरतूद करण्यात आली होती . महिला सम्मान बचत योजना गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत ही 31 मार्च 2025 ही आहे .त्यामुळे च्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी 31 मार्च च्या अगोदर लवकरात लवकर गुंतवणूक करावी . Mahila Samman Bachat Yojana

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

Leave a comment