marathwada rain update मराठवाड्यात पावसाचा हाहाकार शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
marathwada rain update राज्य सर्वत्र पाऊस पडत असताना मराठवाड्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये सरासरीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला या पावसाने मागील 40 वर्षाचा रेकॉर्ड मोडिस काढला. पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यावर खूप मोठे संकट कोसळले या पावसात लाखों हेक्टर वरील कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांचे नुकसान झाले.
सर्वात जास्त नुकसान हे सोयाबीन या पिकाची झाली त्या पाठोपाठ कापूस आणि तू या पिकाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
marathwada rain update शेतकऱ्यांची शेतातील पिके वाहून गेले
मराठवाड्यात मागच्या दोन दिवसापासून पावसाने कहर केलाय या पावसामुळे शेतकऱ्यांचे व शेत पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बारावी परिसर देखील या पावसाने झोडपून काढला आणि या ठिकाणी 2 सप्टेंबर रोजी 87 मिलिमीटर पावसाची नोंद झाली मुसळधार पावसामुळे शेतातील पिके पाण्याखाली आले असून पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. शेती, शेतकरी, जनावरे यांचे सुद्धा नुकसान झालं बऱ्याच ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने गावकऱ्यांना दळणवळणासाठी पर्याय उरलेला नाही.
कापूस सोयाबीन अनुदान केवायसी करण्यास सुरू.
कृषि मंत्री धनंजय मुंडे यांचे पंचनामे करण्याचे आदेश
राज्याचे कृषिमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या विरोधिकाऱ्यांना आपल्या भागातील नुकसानग्रस्त शेती व शेत पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत या आदेशाचे पालन करून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याची आदेश दिले आहेत हे पंचनामे लवकरात लवकर करण्यात यावे अशीही मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पंचनामे करण्याचे दिले आदेश
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके वाहून गेले पिकासोबतच शेतकऱ्यांचं भविष्य आणि स्वप्न हे देखील वाहून गेले हे पाहता पालकमंत्री माननीय अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना धीर देत तुमच्या नुकसानग्रस्त पिकांचे प्रशासनाकडून पंचनामे केले जातील व शासनाकडून नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच ज्या भागात नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाला माहिती देणे गरजेचे आहे. ज्यामुळे शासनाला शेतकऱ्यांना लाभ देण्यास सोयीस्कर होईल असे यांच्याकडून सांगण्यात आले. त्या बरोबरच त्यांनी जिल्हाधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश देखील दिले आहेत.
marathwada rain update कुठे किती नुकसान झाले?
- पाच लाख आठ हजार हेक्टर वरील पिकांचे झाले नुकसान.
- 12 व्यक्तीचे मृत्यू झाल्याची माहिती.
- 259 हेक्टर पेक्षा जास्त फलबाग पिकाचे नुकसान.
- मराठवाड्यातील पावसामुळे 169 जनावरे दगावली आहेत.
- बरेच घरे वाहून गेली तसेच अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात देखीलपाणी शिरले आहे.
- रस्ते वाहून गेल्याने अनेक गावांचे संपर्क तुटले आहेत.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.