Monsoon 2025 : यावर्षी नैलत्य मोसमी वाऱ्याच्या ( मॉन्सून) आगमनाचा प्रवास वे वेळ आधी होण्याची शक्यता आहे .मंगळवार पर्यंत म्हणजेच,13 मे पर्यंत मॉन्सून अंदमान-निकोबार बेट समूहावर दाखल होण्यासाठी पोषक हवामान तयार झाले आहे .यावर्षी केरळमध्ये पाच दिवस अगोदर म्हणजेच 27 मे रोजी मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे असा अंदाज सुवार्ता हवामान विभागणी दिला आहे .हवामान विभागाने मॉन्सूनचे आगमन चार दिवस मागे पुढे होण्याची शक्यता वर्तवली आहे .

दीर्घकालीन आगमनाच्या वेळ लक्षात घेता साधारणता: मॉन्सून 1 जून पर्यंत केरळमध्ये पोहोचत असतो . मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन सात दिवस आधीच किंवा उशिरा होण्याची शक्यता असते .मागच्या वर्षी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन दोन दिवसांनी अगोदरच म्हणजेच 30 मे रोजी झाले होते .केरळमध्ये मॉन्सून पोहोचल्यानंतर सात दिवसांनी (6 जून)रोजी तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र दाखल झाला होता.यावर्षी मॉन्सून पाच दिवसांनी आधीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे .केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील वाटचाल स्पष्ट होणार आहे .Monsoon 2025
हे वाचा : तूर खरेदीसाठी 15 दिवसाच्या मुदत वाढीची मागणी…!
मॉन्सूनचे केरळातील आगमनाचा अंदाज
वायव्य भारतातील कमीत कमी तापमान आणि दक्षिण द्वीपकल्पावरील पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण व वायव्य प्रशांत महासागरातील समुद्र सपाटीलगतचा हवेचा दाब,तसेच चीनच्या दक्षिण समुद्रात होणारा किरणोत्सर्ग ,ईशान्य हिंद महासागरात तपांबराच्या खालच्या थरामध्ये वाहणारे वारे,इंडोनेशिया विभागात तपांबराच्या वर्षा थोरात वाहणारे वारे हे सहा घटक विचारांमध्ये घेऊन मान्सूनचे केरळातील आगमनाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे .Monsoon 2025
हवामान विभागाचा अंदाज
यावर्षी नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या ( मॉन्सून) जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये यंदा 105 टक्के पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिली आहे. या अंदाजात पाच टक्के कमी किंवा जास्त पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.राज्यामध्ये सर्व दूर चांगल्या पावसाचे संकेत आहेत,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पावसाचे प्रमाण हे जास्तीत जास्त राहण्याची शक्यता देण्यात आली आहे.मे महिन्याच्या शेवटी मॉन्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागनिहाय पावसाचे वितरण स्पष्ट करण्यात येणार आहे .Monsoon 2025
मॉन्सूनचे आगमन 27 मे रोजी शक्यता
अंदमानात दोन दिवसात घेणार धडक
नैऋत्य मोसमी वारे अंदमान समुद्रात दाखल होण्यास पोषक वातावरण आहे .13 मे प्रिंट अंदमान आणि निकोबार बेटावर दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .अंदमानत दाखल झाल्यानंतर मान्सूनची चाल वेगाने होण्याचे संकेत आहेत त्यामुळे चार ते पाच दिवसातच मोसमी वारे संपूर्ण अंदमान निकोबार बेटासह बंगालच्या उपसागराच्या आणखीन काही भागात तसेच,दक्षिण अरबी समुद्र,मालदीव आणि कोमोरीन बाबा पर्यंत धडकण्याची शक्यता आहे .यामध्येच दक्षिण अंदमान सागरात समुद्रसपाटीपासून 3.1 ते 4.5 किलोमीटर उंचीवर चक्रवारची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे .Monsoon 2025