Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : विधानसभा निवडणुकी अगोदर महिलांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आली होती. तसेच त्यानंतर सुशिक्षित तरुण-तरुणीसाठी देखील मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना राबवण्यात आली होती . या योजनेअंतर्गत दीड महिन्यामध्ये साडेचार लाख तरुणांनी अर्ज केली होते. सुरुवातीला अनेक तरुणांनी शासकीय कार्यालय मध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यात आले होते . आणि त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वी तेथे काम करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रशिक्षणाचा कालावधी पाच महिन्यांनी वाढविला, पण मात्र, इथून पुढे फक्त खाजगी उद्योग,आस्थापनांमध्येच प्रशिक्षणासाठी अर्ज करता येतील,अट घातली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेले योजना
सरकारने विधानसभा निवडणुकी अगोदर जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana) ,मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, मुख्यमंत्र वयोश्री योजन , मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अशा योजना जाहीर करण्यात आल्या होत्या.या योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण पडू लागला आहे . त्यामुळे सरकारने अनेक योजनेच्या निकषांमध्ये बदल केले आहे. तसेच या योजनेच्या लाभार्थ्यांची काटेकोर पडताळणी केली जात आहे .तसेच, केंद्र सरकारकडून सुशिक्षित तरुण-तरुणीसाठी देखील प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना जाहीर करण्यात आली आहे .
याच धरतीवर राज्य शासनाने दरवर्षीचे उद्दिष्ट देखील कमी करण्यात आले आहे, जेणेकरून शासनाच्या तिजोरीतून दरवर्षी कमीत कमी रक्कम योजनांसाठी खर्च होतील,असेही बोलले जात आहे. Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana
हे वाचा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने
अजूनही सध्या नवीन तरुण आणि तरुणींचे अर्ज स्वीकारणे सुरू झालेली नाही ,अशी सद्यस्थिती आहे. प्रशिक्षणाचा (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana) कालावधी 11 महिने करण्यात आला आहे . आणि अर्जदार तरुणांना प्रशिक्षणाची संधी देताना स्वयं घोषणापत्र देखील घेतले जाणार आहे .
तरुणांना प्रशिक्षणातून रोजगाराची मोठी संधी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana) योजनेचा मुळ हेतू म्हणजे ,तरुणांना चांगल्या ठिकाणी रोजगार मिळावा.या योजनेअंतर्गत इथून पुढे शासकीय कार्यालय,आस्थापनाऐवजी आता तरुणांना खाजगी उद्योग व आस्थापनांमध्ये प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे . या प्रशिक्षणातून तरुणांना नोकरी अगोदर अनुभव मिळावाआणि त्यातूनच चांगल्या ठिकाणी रोजगार मेळावा,हा या योजनेचा उद्देश आहे.तरुणांना प्रशिक्षणाचा कालावधी आता 11 महिने करण्यात आला आहे .
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची स्थिती
- या योजनेची दरवर्षी उद्दिष्टे : 10 लाख तरुण-तरुणी
- प्रशिक्षणाचा कालावधी किती :11 महिने
- दरमहा विद्यावेतन : 6 हजार ते 10 हजार
- दरवर्षी अपेक्षित निधी : 800 कोटी .
योजनेच्या निकषात अलिखित बदल
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खाजगी आस्थापना व उद्योगाकडील एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रांसाठी 20 टक्के तर शासकीय- निमशासकीय अस्थापना,मंडळात मंजूर पदाच्या 5 टक्के उमेदवारांना प्रशिक्षणासाठी घेण्यासंदर्भात तील शासन निर्णय आहे . मात्र, पहिल्याच वर्षी प्रशिक्षणासाठी साडेचार लाख तरुण आणि तरुणींनी अर्ज केले होते .यापैकी दोन लाख तरुणांनी शासकीय कार्यालयामध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज केले .त्यांनी त्याच ठिकाणीकम करण्याची मागणी केली आहे . याच धर्तीवर आता शासकीय कार्यालय ऐवजी खाजगी व सेवा क्षेत्रातील उद्योगांमध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्यांचे अर्ज मंजूर केले जाणार आहेत . सरकारी कार्यालय,विभागामध्ये प्रशिक्षणासाठी तरुणांना अर्ज करता येणार नाहीत.Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana
1 thought on “Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana लाडक्या भावांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या निकषात मोठे बदल”