Rashtriy Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 120 कोटी 33 लाख रुपये निधी वितरण्यास मंजुरी

Rashtriy Krishi Vikas Yojana : राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी निधी वितरणाला मान्यता दिली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रात विकास करण्यासाठी निर्माण केली आहे.

या योजनेअंतर्गत राज्य शासनाने सर्वसाधारण प्रवर्गसह, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांकरिता 120 कोटी 33 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी 21 मार्च रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

Rashtriy Krishi Vikas Yojana

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 2024 – 25 मध्ये नवीन प्रकल्पासाठी निधी मंजूर

राष्ट्रीय कृषी विकास (Rashtriy Krishi Vikas Yojana) योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये नवीन प्रकल्पासाठी मंजुरी देण्यात आली होती .वार्षिक कृती आराखड्या साठी 293 कोटी 29 लाख रुपयेमंजुरी देण्यात आली होती . परंतु,केंद्र सरकारने त्यापैकी प्रकल्प अहवालानुसार 75 कोटी 74 लाख रुपयाच्या मंजुरी देण्यात आली आहे .त्याचा समरूप राज्य सरकारने 48 कोटी 13 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यात येणार

शासन निर्णयानुसार,राष्ट्रीय कृषी विकास (Rashtriy Krishi Vikas Yojana) योजनेच्या अंतर्गत मंजूर प्रकल्पांच्या अमलबजावणीसाठी निधी वितरणास मंजुरी दिली आहे .

  • यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 98 कोटी 21 लाख रुपये पात्र शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे .
  • तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी 14 कोटी 71 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत .
  • आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 7 कोटी 39 लाख रुपयाचा निधी पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे .

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजना .

राष्ट्रीय कृषी विकास (Rashtriy Krishi Vikas Yojana) योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजना .पीक संवर्धन, फलोत्पादन ,दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय ,कृषि संशोधन आणि शिक्षण ,मृद आणि जलसंधारण ,कृषि वित्तीय संस्था ,अन्न साठवणूक आणि गोदाम ,वृक्ष रोपण आणि कृषि विपणन ,इतर कृषि कार्यक्रम आणि सहकार्य ,वनीकरण आणि वन्य जीव.

या योजना राबवल्या जातात .या योजनेअंतर्गत शेतकऱ्यां विविध घटकसाठी अनुदान दिले जाते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला या https://rkvy.da.gov.in/अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल . Rashtriy Krishi Vikas Yojana

Leave a comment