Namo Shetkari पीएम किसान योजनेचे 2000 आले, लाडकी बहीण योजनेचे 3000 येणार, तर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2000 कधी मिळणार?

Namo Shetkari : राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये असे एकूण 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत पाच हप्त्यांमध्ये 10,000 रुपये दिले गेले आहेत. मात्र, सहाव्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी (Namo Shetkari) महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.तर दुसरीकडे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात आले होते. तर, राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च चे 3000 रुपये महिलांना 7 मार्चपर्यंत देण्यात येणार आहेत. पण मात्र, आता शेतकऱ्यांना शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये कधी मिळणार याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Namo Shetkari

नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता कधी येणार?

नमो शेतकरी (Namo Shetkari) महासन्मान निधी योजना राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत राबवली जाते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस करण्यात आलेली होती . तेव्हापासून आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांना 5 हप्त्याची रक्कम मिळाली आहे. या योजनेतून आतापर्यंत 91.45 लाख शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. ऑक्टोबर महिन्यात वाशिम येथे झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पाचव्या हप्त्याचे 2000 रुपये वितरित करण्यात आले होते. परंतु, सहाव्या हप्त्याच्या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

हे वाचा : 2100 लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2100 रुपये; मंत्री अदिती तटकरे यांनी दिली स्पष्टता.

नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ किती जणांना मिळतो? 

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून या अगोदर जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी (Namo Shetkari) महासन्मान निधी योजनेत आतापर्यंत 91.45 लाख शेतकऱ्यांना पैसे पाठवले होते. राज्य सरकारने आतापर्यंत या योजनेसाठी 9000 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम कधी जमा होणार? याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पीएम किसान व लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 19 हप्त्याचे 38000 जमा करण्यात आले आहेत. 24 फेब्रुवारीला 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहेत.पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता देशातील 9.75 कुठे शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

तसेच, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे 3000 रुपये 7 मार्चपर्यंत जमा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांना नमो शेतकरी (Namo Shetkari) महासन्मान निधीच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा आहे. 

निष्कर्ष

पीएम किसानच्या हप्त्यांचे पैसे वेळेवर जमा होतात, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसेही जाहीर वेळेत मिळणार आहेत. मात्र, नमो शेतकरी (Namo Shetkari) महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रतीक्षा आहे. सरकारने लवकरच याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Leave a comment

Close Visit Batmya360