Namo Shetkari Installment :मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दरवर्षी मिळणार15 हजार .

Namo Shetkari Installment : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 ऐवजी 15,000 रुपये देणार अशी घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वसंतराव नाईक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम पीएम किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याच्या वितरणानिमित्त आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस त्यांनी या कार्यक्रमांमध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये 12 हजार रुपये एवेजी वार्षिक 15 हजार रुपये देण्याची घोषणा केली.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Namo Shetkari Installment

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सध्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 12,000 रुपये दिले जातात. मात्र, आता त्यामध्ये 3,000 रुपयांची भर घालून ही रक्कम 15,000 रुपये करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.

हे वाचा : लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची अपडेट! 40 लाख लाभार्थी महिला ठरणार अपात्र ,काय आहे कारण…

फडणवीस पुढे म्हणाले, सुरुवातीला नमो शेतकरी (Namo Shetkari Installment) सन्मान निधी योजनेवर टीका झाली होती. काहींनी या योजनेला कमी लेखले, पण शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदतीसाठी ही रक्कम मोठा आधार ठरली आहे.

पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता वाटप

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीची यांच्या हस्ते बिहार येथील भागलपूर मध्ये पीएम किसान योजनेच्या 19 व्याप्तीचे वितरण करण्यात आले. यावेळी देशभरातील 9 कोटी 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमांमध्ये ऑनलाईन सहभाग घेतला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला .Namo Shetkari Installment

राज्यातील इतर विविध योजनांची माहिती

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात राज्यातील विविध योजनांची माहिती दिली. त्यावेळेस त्यांनी पोखरा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6 हजार कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे, तसेच विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील गावांना त्याचा लाभ मिळणार आहे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे.

भाजपची निवडणूकपूर्व घोषणा पूर्ण

भाजपने विधानसभा निवडणुकी अगोदर पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी (Namo Shetkari Installment) योजनेसाठी हप्ता 15 हजार रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु निवडणूक झाल्यानंतर त्यावर मौन बाळगण्यात आलं . पण मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे सहा आणि नमोचे 6 हजार अशी एकूण 12 हजारांमध्ये 3 हजाराची भर घालण्याची घोषणा केली आहे.म्हणजे आता शेतकऱ्यांना वर्षाचे 12 हजार रुपया ऐवजी 15 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे .

निष्कर्ष

पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आता अधिक आर्थिक सहाय्य मिळणार आहे. वार्षिक 15,000 रुपयांची मदत मिळाल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी अधिक आधार मिळेल. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. Namo Shetkari Installment

1 thought on “Namo Shetkari Installment :मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दरवर्षी मिळणार15 हजार .”

Leave a comment

Close Visit Batmya360