national disaster पुर आणि भुस्खलनामुळे प्रभावित राज्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने निधी जारी केला आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्याला 1492 कोटी रुपयांची सर्वात जास्त आर्थिक मदत मिळाली आहे. या निधीचे वितरण एकूण 14 राज्यांमध्ये पुर आणि भुस्खलनामुळे प्रभावित राज्यांना करण्यात आले असून, महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त वाटा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नैऋत्य मान्सूनमुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार आणि इतर राज्य पुर आणि भुस्खलनाच्या या संकटांना सामोरे गेले आहेत. अशा संकटांना सामोरे गेलेल्या राज्यांना केंद्र सरकारने आर्थिक मदत करण्याचे आशवासन दिले होते, त्यामुळे केंद्र सरकारने आता तातडीने 5858.60 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर कोणत्या राज्याला किती निधी वितरित करण्यात आला आहे याबद्दल खालील प्रमाणे सविस्तर माहिती पाहूया.
हे वाचा : कापूस सोयाबीन अनुदान 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात झाले जमा
national disaster कोणत्या राज्याला किती निधी?
- महाराष्ट्र राज्य: 1492 कोटी .
- आसाम राज्य: 716 कोटी
- आंध्र प्रदेश राज्य: 1036 कोटी
- बिहार राज्य: 655.60 कोटी.
- गुजरात राज्य: 600 कोटी
- हिमाचल प्रदेश: 189.20 कोटी
- केरळ: 145.60 कोटी
- पश्चिम बंगाल :468 कोटी
- तेलंगणा राज्य: 416.80 कोटी.
या आर्थिक मदतीबरोबरच केंद्र सरकारने सर्व बाधित राज्यांना नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) आणि आर्थिक मदत देखील केलेली आहे. पूर आणि भुस्खलनामुळे प्रभावित राज्यांना मदत करण्यासाठी विशेष लक्ष प्रंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
national disaster केंद्र सरकारच्या या मोठ्या मदतीमुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार व्यक्त केले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले, महाराष्ट्रने जे काही आतापर्यंत मागितले ते आतापर्यंत वेळेवर मिळाले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1,492 कोटींचे पॅकेज जारी केले आहे, याबद्दल त्यांचे आभार.”
यापुढील मदत आणि मूल्यांकन
national disaster यावर्षी केंद्र सरकारकडून 21 राज्यांना 14,958 कोटी पेक्षा जास्त निधी आधीच वितरित केली आहे. तसेच इंटर- मिनिस्ट्रियल सेंट्रल टीम्स (IMCTS) मार्फत पूरग्रस्त राज्यांमध्ये नुकसानीचे मूल्यांकन करण्यात येत आहे. आसाम, मिझोराम, केरळ, गुजरात आणि अन्य राज्यांमध्ये IMCTs तैनात असून, या राज्यांना लवकरात लवकरच बिहार आणि पश्चिम बंगालला हे पथक पाठवले जाणार आहे.
1 thought on “national disaster : केंद्र सरकारकडून नैसर्गिक आपत्ति ग्रस्त राज्याला निधी मंजूर”