NOEL TATA : टाटा ट्रस्ट चे नवीन चेअरमनभारताचे महान उद्योगपति व समाजकार्य करणारे रतन टाटा याचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांनी निर्माण केलेल्या सर्व टाटा समूहातील उद्योग व ट्रस्ट ची पुढील धुरा कोण सांभाळणर हा प्रश्न सर्व जनतेच्या मनात पडला आहे. रतन टाटा यांना कोणतेही अपत्य नाही त्या मुळे त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टी चा आणि ट्रस्ट चा आता कोण मालक असणार ह्या कडे सर्वच माध्यमातून चर्चा सुरू आहे.
रतन टाटा यांचा निधनानंतर टाटा ग्रुप चे नवीन अध्यक्ष noel tata हे होतील अशी संभावना वर्तवण्यात येत आहे. टाटा समूहाच्या मालकीचे एवढे मोठे सम्राज्य सांभाळण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड होणे अपेक्षित आहे. टाटा ट्रस्ट च्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य केले जातात, टाटा ट्रस्ट चे नवीन अध्यक्ष यांची निवड देखील टाटा ट्रस्ट च्या सदस्य यांच्यामधून केली जाईल. परंतु सध्या noel tata यांच्या नावाची चर्चा जास्त होत आहे.
हे वाचा : जगाने निस्वार्थी अनमोल महानरत्न गमावले.
NOEL TATA याची निवड होणार का
टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाने मुंबईत झालेल्या बैठकीला अधोरेखित केले असून, टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती करण्याच्या महत्त्वाच्या योजना आखण्यात आल्या आहेत. अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी ट्रस्टमध्ये स्पष्ट मार्गदर्शन आहे, जेणेकरून महत्त्वाचे नेतृत्व पुढे जाऊ शकेल.
सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट हे टाटा सन्सचे मालक आहेत. टाटा ट्रस्ट्सबद्दल सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व १४ टाटा ट्रस्टच्या व्यवस्थापनावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या टाटा ट्रॅस्ट संस्थेवर आहे.
टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा ६५.३ टक्के हिस्सा आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या समूहाची दिशा ठरविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
टाटा ट्रस्टचे कॉर्पोरेटीकरण झाले असून कामकाजाचे व्यवस्थापन करणारी एक कार्यकारी समिती नेमण्यात आली असून त्याला व्यवस्थापन व्यावसायिकांच्या टीमने मदत केली आहे. रतन टाटा कार्यकारी समितीचे प्रमुख होते. वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह हे टाटा ट्रस्टचे उपाध्यक्ष असून मेहली मिस्त्री विश्वस्त आहेत. आता नव्याने कोणाची नियुक्ती अध्यक्ष पदी होते हे पाहणे महत्वाचे असेल.