old pension scheme राज्य कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू.

राज्य कर्मचारी यांना old pension scheme लागू.

old pension scheme केंद्र शासनाने नुकत्याच घेतलेल्या कर्मचारी निवृत्ती पेन्शन योजना त्यात प्रत्येक राज्याला आपापल्या धर्तीवर निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. यामध्येच महाराष्ट्र राज्य शासनाने निर्णय घेतला आहे यामध्ये राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी किंवा कर्मचारी 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहे अथवा त्यांची पदभरतीची जाहिरात आहे ती जाहिरात 01/11 / 2005 पूर्वीच निर्गमित झाली होती, आशा कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984, व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 या अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात आलेला आहे.

 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या धर्तीवर राज्य शासनाने त्यांच्या अधिपत्यातील अधिकारी किंवा कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जे कर्मचारी 2005 नंतर नियुक्त झाले आहेत त्या कर्मचाऱ्यांना ही पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे. त्यासोबतच त्यांचे जे NPS राष्ट्रीय निवृती वेतन प्रणाली अंतर्गत उगडण्यात आलेले खाते संबंधित अधिकारी यांनी तत्काल बंद करून त्या खत्यावरील रक्कम व व्याज हे कर्मचाऱ्याच्या GPF भविष्यनिर्वाह निधी या खात्यावर वर्ग करण्यात यावे अश्या प्रकारच्या सूचना देत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा. जुनी पेन्शन योजना लागू करणे जीआर

Leave a comment