PAN 2.0 Project : केंद्र सरकारने पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, तर जुन्या पॅन कार्ड चे काय,पहा सविस्तर.

पॅनकार्डचे महत्त्व
PAN 2.0 Project : सध्याच्या काळामध्ये पॅनकार्ड हे आर्थिक व्यवहारांसाठी अत्यावश्यक दस्तावेज आहे. बँकिंग व्यवहार, कर भरणा, टीडीएस प्रक्रिया यांसाठी हे पॅनकार्ड आवश्यक लागते. हे पॅनकार्ड निळ्या रंगाचे असून, त्यावर नाव, फोटो, सही, पत्ता आणि 10 अंकी पॅन नंबर असतो.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पण आता सरकारने या पॅन कार्ड मध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. तर आज आपण या लेखामध्ये हा कोणता बदल करण्यात आलेला आहे ते पाहूया.

नागरिकांना हे पॅन कार्ड आता इन्कम टॅक्स फायलिंग, बँक अकाउंट आणि आर्थिक देवाण-घेवाणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे . सरकारला (PAN 2.0 Project ) पॅन 2.0 ची योजना राबवण्यासाठी जवळपास 1435 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मग नंतर या पॅन 2.0 मुळे नागरिकांचे जुने पॅन कार्ड बंद होईल का ? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात येतात. नेमकं पॅन 2.0 आहे तरी काय ? असे वेगवेगळे प्रश्न नागरिकांच्या मनात येत आहे.

केंद्र सरकारने (PAN 2.0 Project) 25 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पॅन कार्ड साठी एक नवीन योजना आखण्यात आलेली आहे. आता पॅन 2.0 अंतर्गत नागरिकांना आता क्यूआर कोड असलेले पॅन कार्ड मिळणार आहे त्या मुळे पाठकण ओळख पठेल .तसेच , सरकारने पॅनकार्डला आणखी सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी पॅन 2.0 हे अपग्रेडेड वर्जन आणले आहे. तसेच कुठल्या प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी अॅडव्हान्स तंत्रज्ञानाची साथ घेतली आहे. हे पॅनकार्ड आणि ई पॅन पेक्षा अधिक सुरक्षित आहे.

सामान्य पॅन कार्ड

  • रूप: निळ्या रंगाच्या प्लास्टिक फॉर्मेटमध्ये असते.
  • घटक: फोटो, सही, नाव, पत्ता, आणि पॅन क्रमांक.
  • उपयोग: बँक व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण, टीडीएस/टिसीएस क्रेडिट, आयकर रिटर्न इत्यादींसाठी.
  • तपशील: हे फिजिकल स्वरूपाचे कार्ड आहे, जे पर्समध्ये ठेवता येते.

हे वाचा : MAHA DBT शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी शिक्षण विभागाची विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम .

PAN 2.0 Project ई-पॅन

  • रूप: डिजिटल स्वरूपात पीडीएफ फॉर्मेटमध्ये उपलब्ध.
  • घटक: यावर क्यूआर कोड असून, त्यामध्ये तुमचा पॅन नंबर आणि वैयक्तिक माहिती संग्रहित असते.
  • उपयोग: लगेच उपलब्ध होणारे पर्यावरणपूरक कार्ड, जे कोणत्याही कागदपत्रांशिवाय उपयोगात येते.
  • फायदे:
    • पेपरलेस प्रक्रिया.
    • कधीही आणि कुठेही डाउनलोड करून वापरण्यायोग्य.

PAN 2.0 Project पॅन 2.0

  • रूप: क्यूआर कोड असलेले अद्ययावत फिजिकल पॅन कार्ड.
  • घटक:
    • क्यूआर कोड: यात तुमची ओळख सहज आणि सुरक्षितरीत्या पडताळली जाणार आहे .
    • अॅडव्हान्स तंत्रज्ञान: फसवणूक टाळण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा.
  • उपयोग:
    • आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक सुरक्षितता.
    • इतर सरकारी दस्तावेजांशी लिंक करणे सोपे.
  • फायदे:
    • आधुनिक आणि सुरक्षित.
    • क्यूआर कोडमुळे व्यवहार वेगवान.
PAN 2.0 Project

PAN 2.0 Project करताना खर्च

सरकारला पॅन 2.0 योजना राबवण्यासाठी 1435 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

सध्याचे पॅनकार्ड वैध राहील का?

बऱ्याच नागरिकांच्या मनामध्ये असा प्रश्न पडतो की सध्याचे पॅन कार्ड वैध राहील का तर हो, तुमचे विद्यमान पॅनकार्डही वैध राहील. पन मात्र, हे अपग्रेड करणे अधिक फायद्याचे ठरेल . सध्या तुम्हाला पॅनकार्डवरून आर्थिक देवाणघेवाण, टीडीएस/टिसीएस क्रेडीत, आयकर रिटर्न करू शकता.

पॅन 2.0 बनवण्यासाठी तुम्हाला onlineservices.nsdl.com करावा लागेल . किंवा तुम्ही याशिवाय पॅन कार्ड केंद्रावर जाऊन पण अर्ज करू शकतात. तुम्ही हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांमध्ये तुमच्या पत्त्यावर पॅन कार्ड येते. नवं क्युआर कोडवालं पॅन कार्ड येण्यासाठी 15 ते 20 दिवस डिलिव्हरी साठी कालावधी लागतो.

PAN 2.0 Project ई-पॅनसाठी अर्ज कसा करावा?

ई-पॅनसाठी तुम्ही डिजिटल फॉर्मेटमध्ये ई पॅन डाऊनलोड करू शकता . पेपरलेस प्रक्रियेअंतर्गत QR कोड-आधारित हे ओळखपत्र आहे. हे पॅन लगेचच मिळेल. तसेच हे पॅन कार्ड पेपरलेस असतं. त्यामुळे पर्यावरण पूरक असतंम्हटलं तर वावगंठरणार नाही. या पॅन कार्डवर किंवा कोड असल्यामुळे हे पॅन कार्ड अपग्रेटेड असेल .

नवीन तंत्रज्ञानाची वाटचाल

पॅन 2.0 मुळे व्यवहार अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहेत. ई-पॅनच्या स्वरूपात कागदविरहित सुविधा, तर पॅन 2.0 मध्ये क्यूआर कोडसह आधुनिक सुरक्षा यामुळे आर्थिक व्यवहार अधिक विश्वासार्ह बनतील.PAN 2.0 Project

1 thought on “PAN 2.0 Project : केंद्र सरकारने पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, तर जुन्या पॅन कार्ड चे काय,पहा सविस्तर.”

Leave a comment