Panjabrao Dakh: सध्या राज्यात पाऊस आकडला! आता पुढे काय? पहा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

Panjabrao Dakh : सध्या राज्यामध्ये पावसाने उघड दिली असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा होत असताना पाहायला मिळत आहे .बऱ्याच भागांमध्ये खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत परंतु आता काही ठिकाणी मात्र अजून देखील चांगला पाऊस पडलेला नाही त्यामुळे अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे .परंतु आता पावसाने उघड दिली आहे .पण जर आता लवकरात लवकर पाऊस आला नाही तर मात्र पिकांना याचा फटका बसू शकेल अशी देखील शक्यता आहे

यामुळे अनेक शेतकऱ्यांना असा प्रश्न निर्माण होत आहे की आता पावसाचे आगमन कधी होईल .यामुळे या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकरी मात्र चिंताग्रस्त झालेला पाहायला मिळत आहे .या पावसाबद्दल प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबरावांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे .ही माहिती शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी खूप महत्त्वाची आहे .चला तर आपण पाहूया काय म्हणतोय पंजाबराव डख यांचा अंदाज .Panjabrao Dakh

Panjabrao Dakh

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज काय?

प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाबद्दल अंदाज वर्तवताना म्हटले आहे की,पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात सर्व दूर मोठा पाऊस पडण्याची शक्यता नाही. जरी कुठे पाऊस झाला तरी तो मोजक्या स्वरूपाचा असेल .म्हणजेच काही भागात पडेल तर काही भागात नाही अशी परिस्थिती असेल .विशेषता: पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण व उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि खानदेश या पट्ट्यात सध्या तरी मोठा पाऊस होण्याची शक्यता कमी आहे,प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले आहे.Panjabrao Dakh

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ramchandra Sable Andaj  Ramchandra Sable Andaj : या जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसणार ;तर ‘या’ जिल्ह्यात पूर येणार! पहा हवामान अंदाज

राज्यात मोठा पाऊस कधी बरसणार?

सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबरावांनी पुढे अंदाज वर्तवताना म्हटले आहे की, आता जुलैपासून संपूर्ण राज्यामध्ये हवामानात बदल पाहायला मिळेल .ज्या भागांमध्ये अजून पुरेसा पाऊस झाला नाही, जसे की नांदेड , लातूर, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि सोलापूर -उदगीरचा भाग ,या ठिकाणी 18 जुलै नंतर चांगला पाऊस पडेल,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद आणि जळकोट या भागातही चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

18 जुलैपासून वातावरण बदलण्याचे कारण म्हणजे दक्षिण भारतातील राज्य जसे की, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे .या राज्याच्या सीमा महाराष्ट्र राज्याला लागू असल्याने,त्याचा सकारात्मक परिणाम हा महाराष्ट्रातील सीमावर्ती जिल्ह्यांवर दिसून येईल आणि तिथे चांगला पाऊस पडेल अशी शक्यता आहे .Panjabrao Dakh

जुलै च्या शेवटच्या आठवड्यात धो धो पाऊस

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे 22 जुलै नंतर संपूर्ण राज्यात पावसाचे वातावरण तयार होणार आहे .प्रसिद्ध हवामान अभ्यासक यांच्या अंदाजानुसार 27, 28 आणि 29 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होईल .असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे .असे पंजाबराव डख यांनी म्हटले .त्यामुळे पंजाबरावांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार अजून राज्यात आठ ते दहा दिवसांच्या आसपास चांगला पाऊस होईल आणि राज्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटेल असे दिसून येत आहे .Panjabrao Dakh

हे पण वाचा:
Gas Cylinder E KYC Update Gas Cylinder E KYC Update: गॅस सिलेंडर वापरताय? मग हे काम 15 ऑगस्टपर्यंत नक्की करा, नाहीतर सिलेंडर मिळणार नाही.

Leave a comment