Particha Monsoon 2024 राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता महाराष्ट्रात परतीचा मान्सून सक्रिय झाला असून पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
हे वाचा : कापूस सोयाबीनचे कसे असणार दर
तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये देखील पाऊस कोसळणार आहे 23 सप्टेंबर 2024 रोजी राज्यांमधील पावसाची स्थिती काय असेल याबद्दल आज आपण आपल्या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. राज्यात आता परतीचा पाऊस सुरू झाला असल्यामुळे काही जिल्ह्यांना हवामान विभागात वारे ऑरेंज कलर जारी करण्यात आलेले आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण आपल्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
Particha Monsoon 2024 कोकण मध्ये पावसाची शक्यता :
मुंबईसह उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे परंतु मुंबईमध्ये उकाडा कायम जाणवेल मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या कोकण मधील जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
विदर्भात पावसाची हजेरी :
हवामान विभागाने विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नागपूर मध्ये सोमवारी 30 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे.
Particha Monsoon 2024 मराठवाड्यात पावसाचा अलर्ट :
Particha Monsoon 2024 मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात येत आहे छत्रपती संभाजी नगर मध्ये 28 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असणार आहे.
दरम्यान राज्यांमधील विविध भागात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून काही भागांना देखील हॅलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
पश्चिम महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी :
Particha Monsoon 2024 महाराष्ट्रामधील पुण्यासह सातारा, सांगली आणि सोलापूर या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुण्यामध्ये 28 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.
1 thought on “राज्यात परतीचा पाऊस घालणार धुमाकूळ ; जाणून घ्या सविस्तर माहिती : Particha Monsoon 2024”