पशूसंवर्धन योजनेत कागदपत्रे चुकली? आता पुढे काय : pashusavardhan yojana new update

pashusavardhan yojana new update : महाराष्ट्र राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना गाय म्हैस, शेळी मेंढी, कुक्कुटपालन या घटकांसाठी अनुदान दिले जात आहे. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज देखील सादर केले होते. अर्ज सादर केल्यानंतर शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्याचे एसएमएस देखील प्राप्त झाले होते. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी आपले कागदपत्र देखील अपलोड केलेले आहेत. परंतु आता या कागदपत्रांमध्ये त्रुटी आली असल्याचे एसएमएस शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवण्यात येत आहेत. मग या शेतकऱ्यांना नेमके कोणते कागदपत्र अपलोड करायचे आणि कधी अपलोड करावे लागतील याची संपूर्ण माहिती आजच्या लेखच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते आणि त्यांचे कागदपत्रे तपासणी दरम्यान चुकीची किंवा अस्पष्ट आहेत अशा शेतकऱ्यांना आता एसएमएस पाठवण्यात आलेले आहेत. आता या शेतकऱ्यांना परत नवीन वेळापत्रकानुसार कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. आवश्यक असणारी कागदपत्रांमध्ये सातबारा, आठ अ ,सहमती पत्र, आपत्य प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, भाडे करारनामा असे विविध कागदपत्र अपलोड केलेले आहेत. परंतु आता यातील काही कागदपत्र त्रुटीमध्ये आल्याचे एसएमएस शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. हे कागदपत्र शेतकऱ्यांना परत नव्याने अपलोड करण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आलेला आहे. याच कालावधीमध्ये हे शेतकरी हे कागदपत्रांची त्रुटी भरून काढू शकतील.

pashusavardhan yojana new update

पशुसंवर्धन विभागाने तपासणी कालावधीसाठी मुदतवाढ घेतल्याने वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार यादी 25 तारखेला त्रुटी कागदपत्र अपलोड करण्याचा उपलब्ध होणारा पर्याय आता लांबणीवर गेला आहे. आता नवीन वेळापत्रकानुसार शेतकऱ्यांना 1 जुलै ते 3 जुलै या कालावधीमध्ये आपली कागदपत्रे नव्याने अपलोड करावी लागतील.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

कोणाला करावी लागणार कागदपत्रे अपलोड

01 जुलै ते 03 जुलै या कालावधीमध्ये त्रुटी मधील कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या पर्यायांमध्ये ज्या शेतकऱ्यांची कागदपत्र त्रुटीमध्ये आले आहेत त्यांनाच कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अपलोड केलेली सर्व कागदपत्र व्यवस्थित किंवा बरोबर असतील त्यांना या ठिकाणी कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता राहणार नाही.

कसे आहे नवे वेळापत्रक

कागदपत्र तपासणीच्या दिरंगाई मुळे या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. बदल केलेले नवीन वेळापत्रक कसे असेल हे पाहूया. त्रुटी मध्ये आलेली कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 01 जुलै ते 07 जुलै हा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर परत अपलोड केलेली कागदपत्र तपासणीची प्रक्रिया 4 जुलै ते 6 जुलै या कालावधीमध्ये पूर्ण केली जाईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम पात्रता लाभार्थी यादी 8 जुलै 2025 रोजी जाहीर केली जाईल.

Leave a comment