Petrol Pump Business : राज्यात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आता अधिक सोपे होणार आहे , कारण राज्य सरकारने पेट्रोल पंप उभारणीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्यात 2 हजार पेट्रोल पंपांची उभारणी करण्याचे नियोजन राज्य सरकारचे आहे . ज्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे .
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे सुमारे 30,000 पेक्षा जास्त लोकांना थेट व अप्रत्यक्षरित्या नोकऱ्या मिळतील.

एक खिडकी योजना पेट्रोल पंप सुरू करणे झाले सोपे
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे की, पेट्रोल पंप उभारणी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एक खिडकी’ सुरू करण्यात येईल. यामुळे इंधन कंपन्यांना महसूल विभागांकडून (जसे की एनएसह पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग) आवश्यक असलेल्या ‘ना हरकत’ परवानग्यांची प्रक्रिया जलद गतीने होईल. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पेट्रोल (Petrol Pump Business) पंप उभारणी सुलभ होईल आणि अर्ज प्रक्रियेला वेळ लागणार नाही.
हे वाचा : नव्या शैक्षणिक वर्षापासून खाजगी शाळा बसेससाठी नवीन नियम लागू; काय आहेत नवीन नियम घ्या जाणून…
पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी कमी अटी शर्ती
राज्यातील 1660 पेट्रोल पंपाच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. महसूल विभागाला एक खिडकी योजना सुरू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात याद्वारे मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष वअप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल होईल. एका अहवालानुसार 30 हजार रोजगार निर्मिती होऊ शकेल.
तसेच पेट्रोल पंप (Petrol Pump Business) सुरू करण्याची प्रक्रिया पुढच्या तीन महिन्यात पूर्ण व्हावी . यासाठी अत्यावशक आणि कमीत कमी अटीत ठेवण्याचे निर्देश महसूल विभागाला देण्यात आले आहे .विभागीय आयुक्तांनी याबद्दल तातडीने सूचना पाठवण्यात याव्यात,असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत .
रोजगार निर्मिती आणि गुंतवणूक
राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे राज्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होणार आहे .केंद्र सरकारने 1660 पंप मंजूर केले . हे पंप (Petrol Pump Business) सुरू झाल्यानंतर राज्यात 30 हजार तरुणांना रोजगार संधी मिळणार आहे राज्यात साडेतीन ते 4 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे . रोजगार निर्मिती व गुंतवणूक याला प्राधान्य असल्याने ,एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असे बावनकुळे यांनी सांगितले. .
निष्कर्ष
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पेट्रोल पंप सुरू करणे अधिक सुलभ आणि जलद होईल. ‘एक खिडकी’ योजनेचा अवलंब केल्यामुळे अर्ज प्रक्रिया सोपी होईल आणि अनेक लोकांना रोजगार मिळवण्याचा अवसर मिळेल. यामुळे राज्याच्या आर्थिक वाढीला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. Petrol Pump Business
1 thought on “Petrol Pump Business :स्वतःचा पेट्रोल पंप सुरू करायचा आहे? मग करा तयारी; सरकारच्या या निर्णयामुळे अर्ज करणे झाले सोपे!”