pik vima takrar: पिकाचे नुकसान झालंय अशी करा पिक विमा कंपनीकडे तक्रार..

pik vima takrar: राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील शेती पिकांचे तसेच फळ पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनात आले. ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी आपली पिक विमा तक्रार पिक विमा कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे. पिकाची नुकसान तक्रार सादर केली तर शेतकऱ्यांना पिक विमा वितरित केला जातो. जे शेतकरी आपल्या पिकाची तक्रार करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम वितरित केली जात नाही.

राज्यात बहुतांश भागात अवकाळी पावसाने पिकांची नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार पिक विमा कंपनीकडे करणे आवश्यक आहे. की तक्रार आपण ऑनलाइन पद्धतीने देखील सादर करू शकता. पिकाचे नुकसान झालेली तक्रार कंपनीकडे कशी सादर करायची याची सविस्तर माहिती आजच्या लेखात आपण घेणार आहोत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अशी करा पीक विमा तक्रार pik vima takrar

  • पीक नुकसान तक्रार नोंदवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये क्रॉप इन्शुरन्स हे ॲप असणे आवश्यक आहे.
  • प्ले स्टोर वरून देखील आपण हे ॲप डाऊनलोड करू शकता.
  • ॲप डाऊनलोड झाल्यानंतर ॲप ओपन करा.
  • ॲप उघडल्यानंतर आपल्यासमोर लॉगिन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • लॉगिन या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपण पिक विमा भरताना जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर भरा.
Screenshot 2025 03 31 20 03 34 53 9e52091906d4a596e76104c33265dba6 edited
  • त्यानंतर लॉगिन विथ ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
  • आपल्या मोबाईल क्रमांक वर एक ओटीपी पाठवण्यात येतो त्या ठिकाणी भरा.
  • त्यानंतर व्हेरिफाय या बटणावर क्लिक करा.
  • व्हेरिफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण केलेल्या पिक विमा अर्जाची संपूर्ण माहिती दिसेल.
  • यात आपल्याला क्रॉप लॉस इंस्हाटिमेशन पर्याय निवडावा लागेल.
  • इस्टिमेशन पर्याय निवडल्यानंतर आपल्याला आपले राज्य निवडावे लागेल.
  • त्यानंतर आपल्याला हंगाम निवडावा लागेल.
  • आपण कोणत्या पिकाची तक्रार करायची आहे ते निवडावे लागेल. (Pmfbt/wbcis)
  • त्यानंतर वर्ष निवडावे लागेल.
  • प्रोसेड या पर्यावरण क्लिक करावे लागेल.
  • आपल्यासमोर आपला पॉलिसी नंबर आणि पॉलिसी ची माहिती दाखवली जाईल.
  • आपल्या पॉलिसी नंबर आणि पॉलिसी माहिती यावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्या ज्या पिकाचे नुकसान झाले आहे ते पीक निवडा.
  • त्यानंतर पिकाची नुकसानीची अवस्था निवडा.
  • पिकाची स्थिती निवडा.
Screenshot 2025 03 31 20 04 15 67 9e52091906d4a596e76104c33265dba6

  • पीक नुकसानीचे कारण निवडा.
  • नुकसान झाल्याची तारीख निवडा (तक्रार करताना नुकसान ची तारीख 72 तासाच्या आतील असावी)
  • पिकाचे किती नुकसान झाले आहे याची टक्केवारी भरा.
  • पीक नुकसान झाले ते फोटो घ्या.
  • कमेंट मध्ये पिकाचे अशा पद्धतीने नुकसान झाले त्याची सविस्तर माहिती द्या.
  • शेवटी खालील सबमिट या पर्यावरण क्लिक करा.

तक्रार केल्यानंतर पुढील प्रक्रिया

pik vima takrar पिक विमा तक्रार ॲप्स च्या माध्यमातून नोंदवल्यानंतर पिक विमा कंपनीकडून आपल्या पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रतिनिधी पाठवण्यात येतील. या प्रतिनिधी कडून आपल्या पिकाचे खरंच नुकसान झाले आहे का याची पूर्णता तपासणी केली जाईल. आपल्या पिकाचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे याची माहिती पिक विमा कंपनी प्रतिनिधीकडून कंपनीकडे पाठवली जाईल. कंपनीला मिळालेल्या माहितीच्या आधारे कंपनीकडून आपल्या पिक विमा अर्जावर पुढील कार्यवाही केली जाईल.

तक्रारी साठी इतर माध्यम देखिल उपलब्ध

pik vima takrar पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे ॲपच्या माध्यमातून तक्रार करणे. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. परंतु काही शेतकऱ्यांना आजच्या माध्यमातून माहिती भरणे शक्य होत नाही. काही ठिकाणी नेटवर्क चा प्रॉब्लेम असल्यामुळे देखील ॲप व्यवस्थित चालत नाही. अशावेळी शेतकरी कंपनीच्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून देखील आपले पीक नुकसान झाल्याची तक्रार नोंदवू शकतात.

याशिवाय आपण आपल्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून त्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून देखील आपल्या पिकाचे नुकसान झाले असल्याची तक्रार नोंदवू शकता. कृषी सहाय्यक तुमच्या मिळालेल्या तक्रारीची माहिती पीक विमा कंपनीला देतील आणि पीक विमा कंपनीकडून पुढील कार्यवाही पूर्ण केली जाईल.

Leave a comment

Close Visit Batmya360