pink e rikshaw : महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल विविध उपक्रम राबवते. राज्य शासन किंवा केंद्रशासन महिलांना व्यवसायामध्ये तसेच अनेक उद्योग क्षेत्रात नोकरी क्षेत्रात पुढाकार देण्यासाठी विविध योजना राबवते. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील दहा हजार महिलांना स्वावलंबी बनवण्याचा निर्धार केलेला आहे. या अनुषंगाने राज्यातील दहा हजार महिलांना रोजगार निर्मितीसाठी पिंक इ रिक्षा वाटप केली जाणार आहे. रोजगार निर्मिती सोबतच महिलांची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता वाढवण्याचा देखील शासनाचा हेतू आहे.pink e rikshaw

काय आहे योजना
पिंक इ रिक्षा (pink e rikshaw) ही योजना राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. योजनेची सुरुवात नागपूर येथून करण्यात आलेली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य ठाकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर शहरांमध्ये दोन हजार गरजू महिलांना पिंकी रिक्षाचे वाटप करण्यात आलेले आहे. यापुढेही योजना राज्यातील प्रमुख शहरांमध्ये म्हणजेच कोल्हापूर, अहिल्यानगर ,अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे. या एकूण आठ जिल्ह्यांमध्ये आवश्यकतेनुसार दहा हजार पिंक इ रिक्षा सरकारकडून वाटप केले जाणार आहेत.pink e rikshaw
हे वाचा : वाहनांना HSRP पाटी बसवण्यासाठी मुदत वाढ! कोणत्या वाहनासाठी किती पैसे लागणार? येथे पहा
महिलांना रक्कम भरावी लागणार
ही राज्य शासनाने निर्गमित केलेली योजना आहे. या योजनेचे अंतर्गत महिलांना पिंक रिक्षा खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. रिक्षाच्या एकूण किमती पैकी 20% अनुदान राज्य शासनाकडून वितरित केले जाणार आहे. दहा टक्के रक्कमी लाभार्थी यांना स्वतः भरावी लागणार आहे. तर 70 टक्के रक्कम ही सवलतीच्या व्याजदरावर कर्ज म्हणून उपलब्ध करून दिली जाणार आहे. कर्ज स्वरूपात घेतलेले रकमेचे हप्ते हे लाभार्थी महिलेला स्वतः भरावे लागणार आहेत. pink e rikshaw
महिलांसाठी सुरक्षा निर्माण होणार
राज्यातील महिलांसाठी खास करून सुरक्षा प्रदान करण्याचे हेतूने शासनाने ही योजना सुरू केली आहे. महिला चालक असल्यामुळे इतर महिलांना एक सुरक्षिततेचा प्रवास पर्याय उपलब्ध होणार आहे. महिलांच्या हातात वाहन दिल्यामुळे अनेक गैरप्रकार देखील थांबतील. राज्यातील महिलांना स्वावलंबी पद्धतीने जगता येईल त्यासोबतच महिलांची सुरक्षा देखील बळकट होईल.pink e rikshaw
महिलांना प्रशिक्षण देखिल मिळणार
सरकारकडून महिलांना अनुदानावर ई-रिक्षा (pink e rikshaw) वाटप केले जाणार आहेत. त्यासोबतच महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. यासोबतच महिलांना ड्रायव्हिंग क्लासेस वाहन देखभाल व सेवा सुविधांची माहिती देणारे कार्यशाळा देखील घेण्यात येणार आहे. ज्याच्या माध्यमातून महिलांना वाहनाबद्दलचे अधिक ज्ञान प्राप्त होईल. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना फक्त वाहन वाटप केले जाणार नाही. तर महिलांना पूर्णता व्यवसायासाठी तयार करून त्यांच्या उद्योगाला एक नवी दिशा निर्माण करून देण्याचा संकल्प शासनाने हाती घेतलेला आहे.
महीला आत्मनिर्भर बनतील
नागपूर येथील कार्यक्रमादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना लाडकी बहीण योजनेसारखीच आहे असे सांगितले. ज्या पद्धतीने शासनाने लाडक्या बहिणींना आर्थिक मदत देऊन महिलांचे आरोग्य शिक्षण आणि जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे पिंकी रिक्षाच्या माध्यमातून देखील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. या पिंक इ रिक्षाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होईलच त्यासोबतच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये महिलांना सुरक्षित प्रवास देखील करता येणार आहे.
राज्य शासनाच्या पिंकी रिक्षा या योजनेच्या माध्यमातून महिलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. महिलांचा सामाजिक स्तर उंचावून कुटुंबांनाही त्यांच्या आर्थिक मदत प्राप्त होईल. या मोहिमेच्या माध्यमातून राज्य शासन राज्यातील हजारो महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित असणाऱ्या महिलांना असे संबोधित करत त्यांना शुभेच्छा देखील दिले आहेत.pink e rikshaw