pm internship पीएम इंटरशिप नोंदणी साठी 2 दिवस शिल्लक. आजच करा नोंदणी.

pm internship देशामध्ये केंद्र सरकार तसेच राज्य सरकार नागरिकांच्या हितांच्या विविध योजना राबवत असतो. यातच केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना पीएम इंटरशिप योजना. pm internship या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. या योजनेच्या माध्यमातून युवा पिढीला कौशल्यपूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवण्यात आली. या योजनेमध्ये ऑनलाईन नोंदणी करून यासाठी पात्रता व लाभ कसा मिळवायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पीएम इंटरशिप योजना अंतर्गत तेल, वायू, ऊर्जा, पर्यटन, ऑटोमोटिव्ह, बँकिंग, आणि वित्तीय सेवासह एकूण 24 विविध क्षेत्र यामध्ये समाविष्ट केले आहेत. या विविध क्षेत्राच्या माध्यमातून तरुणांना कौशल्य प्रशिक्षण वितरित करण्याचं काम केलं जाणार आहे त्यासोबतच त्यांना प्रति महिना 5000 रुपये या प्रमाणात मानधन देखील वितरित केला जाणार आहे.

नोंदणीसाठी फक्त दोनच दिवस शिल्लक

पीएम इंटरशिप (pm internship) योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी 12 ऑक्टोबर 2024 पासून नोंदणी सुरू झालेली आहे. परंतु ही नोंदणी करण्यासाठी 25 ऑक्टोंबर 2024 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. त्यामुळे पात्र असणाऱ्या तरुणांनी/लाभार्थ्यांनी येत्या दोन दिवसात आपली नोंदणी पोर्टलवर करून घ्यावी जेणेकरून त्यांना पीएम इंटरशिप योजनेचा लाभ घेता येईल.

pm internship योजना पात्रता

  • अर्जदार भारतीय रहिवाशी असावा
  • अर्जदाराचे वय 21 ते 24 दरम्यान असावे
  • अर्जदार हा पूर्ण वेळ रोजगार किंवा पूर्णवेळ शिक्षण घेणारा नसावा ऑनलाईन कोर्सेस किंवा ऑनलाइन शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण घेणाऱ्या तरुणांना अर्ज करण्याची संधी दिली जाते.
  • इंटरशिप कार्यक्रमास अर्जदारांनी त्यांचे उच्च प्राथमिक शिक्षण पूर्ण केले असावे त्यासोबतच आयटीआय, पॉलिटेक्निक, डिप्लोमा केला असावा तसेच बीए, बीएससी, बी कॉम,इंजिनियरिंग, यापैकी कोणत्याही क्षेत्रात शिक्षण झालेल्या असल्यास अर्ज करू शकतात.

पीएम इंटरशिप साठी कोणती कागदपत्रे लागतील.

पीएम इंटरशिप योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याबद्दलची माहिती पाहूयात. इंटरशिप साठी अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, त्यासोबत आपलं शैक्षणिक प्रमाणपत्र पासपोर्ट फोटो या कागदपत्रांची आवश्यकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागते.

अर्ज कोठे करावा

या योजनेत सहभाग घेण्यासाठी व लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे .शासनाने यासाठी एक संकेतस्थळ तयार केले आहे. https://pminternshipscheme.com/ या संकेतस्थळावर जाऊन आपण आपली नोंदणी पूर्ण करू शकता. नोंदणी पूर्ण केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या अर्जाचे स्टेटस देखील पाहता येते.

किती मिळणार मानधन

पीएम इंटरशिप योजना अंतर्गत निवड झाल्यानंतर निवड झालेल्या लाभार्थी यांना केंद्र शासनाकडून 4 हजार 500 रुपये व ज्या कंपनी अंतर्गत निवड झाली आहे, त्या कंपनीकडून 500 रुपये प्रति महिना या प्रमाणात निधी वितरित केला जातो हा निधी जास्तीत जास्त बारा महिने पर्यंत वितरित केला जातो.

पीएम इंटरशिप योजना नोंदणी अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

pm internship scheme 2024 registration

Leave a comment