PM Internship 2025 :पीएम इंटर्नशिप 2025 च्या दुसऱ्या टप्प्याची नोंदणी प्रक्रिया सुरू,जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि महत्त्वाचे तपशील!

PM Internship 2025 : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे .रोजगारक्षम बनवण्याच्या आदेशाने या योजनेचा सुरुवात करण्यात आलेली आहे .इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर असं करून घ्यावे .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पीएम इंटर्नशिप 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे,आणि अर्ज करण्याची शेवट तारीख 12 मार्च आहे . त्यामुळे ज्या तरुणांनाअर्ज करायचा आहे त्यांनी 5 इंटर्नशिप साठी अर्ज करू शकतात . इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी प्रक्रिया करू शकतात .
नोंदणीकृत उमेदवारांना देशातील प्रसिद्ध कंपन्यांमध्ये कौशल्यवृद्धी आणि काम शिकवण्याची संधी मिळेल . तसेच त्यांना दरमहा ठराविक मानधन देखील दिले जाईल .

PM Internship 2025

PM Internship 2025 नोंदणी प्रक्रिया

कॉर्पोरेट बाबी मंत्रालयाच्या वतीने केली जात आहे .मंत्रालयानुसार ,प्रत्येक इंटर्नल 5,000 रुपये प्रति महिना आर्थिक साहाय्य मिळेल .याशिवाय 6 हजार रुपये एक रकमे प्रदान करण्यात येणार आहे. तसेच इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कुठल्याही प्रकारची अर्ज फी भरावी लागणार नाही

हे वाचा : लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! पैसे जमा होण्यास सुरुवात ,1500 का 3000 रुपये ? पहा सविस्तर…

इंटर्नशिपची कालावधी किती असतो?

पीएम इंटर्नशिप (PM Internship 2025) योजनेचा कालावधी हा एका वर्षाचा आहे . 5 इंटर्नशिप साठी उमेदवार अर्ज करू शकतात .या 12 महिन्यांमध्ये, उमेदवारांनी इंटर्नशिप कालावधीचा अर्धा वेळ प्रत्यक्ष कामाच्या अनुभव किंवा नोकरीच्या वातावरणात घालवला पाहिजे .उमेदवारांनी या योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला https://pminternship.mca.gov.in/login/ भेट देऊ शकतात .

PM Internship 2025 पात्रता

पीएम इंटर्नशिप (PM Internship 2025) योजनेचा अर्ज करण्यासाठी 21 ते 24 वर्ष वय असले पाहिजे .तसेच उमेदवार हा 10 वी किंवा 12 वी ,ग्रॅज्युएट आणि पीजी डिप्लोमा धारक अर्ज करू शकतात तसेच ,ज्या उमेदवारांना अगोदर कोणतीही नोकरी नाही किंवा रोजगार नाही असे उमेदवार अर्ज करू शकतात .

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • तुम्हाला सर्वप्रथम पीएम इंटर्नशिपच्या अधिकृत वेबसाईटवर https://pminternship.mca.gov.in/login/ जावे लागेल .
  • त्यानंतर होम पेजवर दिलेल्या नोंदणी लिंक वर क्लिक करावे लागेल .
  • नोंदणी लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती(मोबाईल नंबर,ई-मेल आयडी इत्यादी)सर्व व्यवस्थित भरून नोंदणी करा या वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल .
  • अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात .

कोणत्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळेल?

मागच्या वर्षी ऑक्टोबर 2024 मधील सदर योजनेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एचडीएफसी बँक, आयशर, एनटीपीसी, मारुती सुझकी, आयसीआयसीआय बँक, पावरग्रीड, मणप्पुरम फायनान्स लिमिटेड, मुथूट फायनान्स, ज्युबिलन्ट अॅग्री अॅन्ड कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, इंडियन ऑइल, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अशा भारतातील 193 मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत.

2024-25 केंद्रीय बजेटमध्ये अशी घोषणा करण्यात आली होती की या योजनेमध्ये टॉप 500 कंपन्यांना पुढच्या 5 वर्षात 1 कोटी युवकांना इंटर्नशिपची संधी दिली जाईल .PM Internship 2025

2 thoughts on “PM Internship 2025 :पीएम इंटर्नशिप 2025 च्या दुसऱ्या टप्प्याची नोंदणी प्रक्रिया सुरू,जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि महत्त्वाचे तपशील!”

Leave a comment

Close Visit Batmya360