PM kisan 18th installment देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारकडून पी एम किसान योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति महिना 500 रुपये या प्रमाणात आर्थिक मदत दिली जाते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार या प्रमाणात निधी वितरीत केला जातो या सहा हजार रुपयांचे हप्ते प्रति दोन हजार रुपये या प्रमाणात शेतकऱ्यांना व्यतिरिक्त केले जातात.
PM kisan 18th installment पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्ते वितरित करण्यात आले आहे म्हणजेच जे देशातील लाभार्थी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेअंतर्गत 34 हजार रुपयांचा आर्थिक लाभ केंद्र सरकारकडून देण्यात आलेला आहे यातच शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागली होती त्यामध्ये अठरावा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार याची प्रतीक्षा आता संपलेली आहे म्हणजेच शासनाकडून अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
PM kisan 18th installment कधी होणार हप्त्याच वितरण.
PM kisan 18th installment केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना येते पाच ऑक्टोबर रोजी पुढील हप्ता म्हणजेच 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
येत्या पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान चा हप्ता दोन हजार रुपये डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येणार असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
हे वाचा : शेतकऱ्यांना मिळणार आधार कार्ड प्रमाणे नवीन कार्ड
तारीख निश्चित झालेली खात्री कुठे करावी.
पी एम किसान योजनेची तारीख प्रसिद्ध करण्यात आली आहे, ही तारीख कुठे पहावी व याची खात्री कोठे करावी याबाबत बऱ्याच जणांच्या मनात शंका असते त्यामुळे या अधिकृत जाहीर केलेल्या तारखेची खात्री आपण https://pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी जाहीर केल्याचे आपल्याला दिसेल.
यामध्ये शेतकऱ्यांना येत्या 5 ऑक्टोंबर 2024 रोजी पुढील हप्ता म्हणजेच 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
कोणाला मिळणार 18 व्या हप्त्याचा लाभ. PM kisan 18th installment
देशातील पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जातो परंतु यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी आपल्या पीएम किसान खात्याची KYC पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यासोबतच लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार सोबत लिंक असणे आवश्यक आहे कारण वितरित करण्यात येणारी रक्कम ही डीबीटीच्या सहाय्याने वितरित केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारसदग्न आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे जेणेकरून या शेतकऱ्यांना येणाऱ्या हप्त्याचे म्हणजेच 18 व्या हप्त्याची पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.
KYC कशी करावी .
KYC करण्यासाठी सरकारच्या अधिकृत संकरतस्थळावर म्हणजे https://pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर आपण आपली kyc करू शकतात. आपण त्या ठिकाणी फार्मर KYC अवलंब करून otp च्या सहाय्याने आपली kyc पूर्ण करू शकता. पोर्टल वर गेल्यानंतर आपल्या समोर पीएम किसान kyc हा टॅब दिसेल त्या टॅब वरती क्लिक करून आपण आपली kyc पूर्ण करू शकता. त्या सोबतच आपल्या जवळीक csc सेंटर वर देखील बायोमॅट्रिक च्या सहाय्याने देखील kyc पूर्ण करू शकता.