pm kisan 19 instalment : पीएम किसानचा 19 वा हप्ता कधी मिळणार?अपेक्षित तारीख जाहीर;शेतकऱ्यांना दुप्पट पैसे देण्याची शिफारस?

pm kisan 19 instalment : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 19 वा हप्ता लवकरच मिळणार आहे. अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. सरकार कडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पीएम किसान योजनेचा हप्ता दर चार महिन्याला वितरित केला जातो त्या नुसार फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता वितरित केला जाईल अशी अपेक्षा आहे. pm kisan 19th installment date

pm kisan 19 instalment

pm kisan 19 instalment वा हप्ता कधी मिळणार?

द इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, पीएम किसान योजनेअंतर्गत 19 वा हप्ता फेब्रुवारीच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. याआधीचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला होता. शेतकऱ्यांनी याआधी जानेवारीत हप्ता मिळेल अशी अपेक्षा केली होती, परंतु त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

हे वाचा : कांदा चाळीचे यावर्षी 2 कोटी 3 लाख रुपयांचे अनुदान अद्याप प्रलंबित,पहा सविस्तर .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
LPG Gas Cylinder LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

pm kisan 19 instalment योजनेची वैशिष्ट्ये

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये ₹2,000 प्रमाणे वर्षभरात वितरित केली जाते. आतापर्यंत 18 हप्ते दिले गेले असून आता 19 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे परंतु 19 वा हप्ता जानेवारीत मिळण्याची शक्यता होती पण आता तो हप्ता फेब्रुवारी मध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

काय आहे शिफारस? शेतकऱ्यांना दुप्पट रक्कम मिळणार?

देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी नियुक्त समितीने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी काही शिफारसी केल्या आहेत. सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रुपये .₹6,000 दिले जातात ,तर ही रक्कम वाढवण्याची शिफारस केली आहे सध्या दिल्या जाणाऱ्या रकमेच्या दुप्पट म्हणजे ₹12,000 देण्याची शिफारस समितीने केली आहे. हा प्रस्ताव मान्य होतो की नाही, हे अजून केंद्र सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे.

महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान योजना

महाराष्ट्रात केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 दिले जातात. अशाप्रकारे, पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनांच्या एकत्रित लाभामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी ₹12,000 मिळत आहेत.

हे पण वाचा:
PM Vishvakarma Yojana PM Vishvakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना; कारागिरांना ₹15,000 व टूलकिटसह अनेक लाभ, असा करा अर्ज!

शेतकऱ्यांसाठी नवीन आशा

pm kisan 19 instalment 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळाला होता. आता फेब्रुवारी 2025 मध्ये 19 वा हप्ता मिळेल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय पीएम किसान योजनेची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला जातो का, याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष आहे. विविध शेतकरी संघटना मार्फत शेतकऱ्यांना मिळणरी रक्कम वाढवावी अशी मागणी केली जात आहे. या मागणी ला केंद्र सरकार कडून येत्या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात येते का हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.

सरकारच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष

pm kisan 19 instalment पीएम किसानची रक्कम वाढवण्याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेईल, अशी शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरू शकतो.

शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या या योजनांचा अधिकाधिक लाभ घेणे गरजेचे आहे. आगामी काळात शेतकऱ्यांसाठी अधिक सकारात्मक बदल होण्याची आशा आहे.

हे पण वाचा:
Kisan Mandhan Kisan Mandhan: सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार दरमहा 3,000 रुपये पेन्शन, वर्षाला 36,000 रुपयांचा लाभ! लगेच करा अर्ज

Leave a comment