PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी खुशखबर!PM किसान योजनेचा 19 वा हप्ता या दिवशी होणार जमा, तारीख फिक्स

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार अंतर्गत पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जाते . या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभरात 6000 रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर तीन समान हप्त्यांमध्ये दर चार महिन्यांनी 2000 रुपये हप्त्याच्या स्वरूपात दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्ते देण्यात आले आहेत आणि आता 19 वा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे.

PM Kisan Yojana

पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता

अनेक दिवसापासून (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना पुढचा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागलेले होते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 18 हप्ते वितरित करण्यात आले असून, आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली कारण की,पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारीला जमा होणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे .

हे वाचा : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता या दिवशी मिळणार;आतापर्यंत ठरल्या अपात्र 5.50 लाडक्या बहिणी

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
LPG Gas Cylinder LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

PM Kisan Yojana या योजनेचा लाभ कोण घेऊ शकेल

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील अटी पूर्ण कराव्या लागतात:

  • अर्जदार हा भारतातील नोंदणीकृत शेतकरी असावा.
  • अर्जदाराच्या नावावर शेती जमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर व्यावसायिक नोकरी, करदाता किंवा मोठी जमीन नसावी.

पीएम किसान योजनेचा हप्ता ऑनलाईन कसा तपासायचा?

जर तुम्हाला पीएम (PM Kisan Yojana) किसान 2000 रुपये ऑनलाईन पद्धतीने तपासायचे कसे याची माहिती हवी असल्यास खालील पद्धत वापरा

  • पीएम किसान योजनेचा हप्ता तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला Beneficiary Status या पर्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
  • आणि नंतर तपशील पाहण्यासाठी Get Data वर क्लिक करावे लागेल.
  • अशा पद्धतीने तुम्ही पीएम किसान योजनेचे 2000 रुपये ऑनलाईन तपासू शकाल.

पीएम किसान खात्यातील शिल्लक कशी तपासाल?

  • PM Kisan Portal वर जा.
  • मोबाइल क्रमांकाच्या मदतीने लॉगिन करा.
  • तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासा.

बँक खाते पीएम किसानशी लिंक करण्याची पद्धत

जर तुम्हाला तुमचे बँक खाते पीएम किसान (PM Kisan Yojana) योजना सोबत लिंक नसेल आणि ते करायचे असेल तर, तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँकेला भेट द्यावी किंवा ऑनलाईन पद्धतीने अपडेट करावे लागेल.

हे पण वाचा:
PM Vishvakarma Yojana PM Vishvakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना; कारागिरांना ₹15,000 व टूलकिटसह अनेक लाभ, असा करा अर्ज!

पीएम किसान KYC महत्त्वाची आहे का ?

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांना हप्ता मिळणार नाही. KYC करण्यासाठी CSC केंद्रात किंवा PM Kisan Portal वर जाऊन प्रक्रिया पूर्ण करू शकाल .

पीएम किसान योजनेचा अर्ज कसा करावा?

  • ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा (PM Kisan Yojana) अजून अर्ज केलेला नाही त्या शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेचा अर्ज करायचा असेल तर .
  • त्यांनी सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर जावे लागेल.
  • पी एम किसान पोर्टल वर गेल्यानंतर New Farmer Registration वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा आधार क्रमांक, बँक तपशील, शेतीची माहिती व्यवस्थित भरून घ्या.
  • आणि फॉर्म सबमिट करा.
  • अशा पद्धतीने तुम्ही पी एम किसान योजनेचा अर्ज करू शकाल.

PM Kisan Yojana महत्त्वाची सूचना

  • 24 फेब्रुवारी 2025 रोजी 19 वा हप्ता जमा होणार आहे.
  • शेतकऱ्यांनी वेळेत KYC प्रक्रिया पूर्ण करून हप्ता मिळावा याची खात्री करावी.

हे पण वाचा:
Kisan Mandhan Kisan Mandhan: सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार दरमहा 3,000 रुपये पेन्शन, वर्षाला 36,000 रुपयांचा लाभ! लगेच करा अर्ज

Leave a comment