PMJJBY : सध्याच्या काळामध्ये आर्थिक सुरक्षितता ही प्रत्येक कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे .विशेषता: जर कुटुंबाचा प्रमुख कमवता व्यक्ती अचानक निधन पावली, तर याचा पश्चाताप राहिलेल्या कुटुंबातील व्यक्तींसमोर मोठे संकट उभे राहते .
अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला कमीत कमी आर्थिक आधार तरी मिळू शकतो .या योजनेची सुरुवात केंद्र सरकार द्वारे 2015 मध्ये सुरू करण्यात आली आहे .या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या व्यक्तींना अत्यंत कमी प्रीमियम मध्ये मोठा विमा संरक्षण कवच दिले जाते .PMJJBY

ही योजना कोणासाठी ?
ही योजना 18 ते 50 वयोगटातील सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे .यासाठी नागरिकांचे बँक खाते असणे आवश्यक आहे .योजनेत लाभ घेतल्यानंतर विमा संरक्षण 55 व्या वर्षापर्यंत लागू राहतो .ही योजना बँक खात्याशी संलग्न असते .
म्हणजे, बँक खात्यातूनच हप्ता दरवर्षी कट केला जातो .या योजनेअंतर्गत वर्षाला फक्त 436 रुपये भरून तुम्ही दोन लाख रुपयांचा विमा कवच प्राप्त करू शकतात .याची रक्कम फक्त वर्षात एकदाच बँक खात्यांमधून वसुली केली जाते .साधारणपणे हा हप्ता 17 मे ते 5 जून या कालावधीमध्ये कट केला जातो .PMJJBY
या योजनेचा (PMJJBY) उद्देश
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा उद्देश म्हणजे सर्वसामान्य आणि मध्य वर्गीय नागरिकांच्या कुटुंबांना आर्थिक संकटाच्या वेळी आधार मिळावा हा आहे .जर खातेदार व्यक्तीचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबातील नामनिर्दिष्ट व्यक्तीला दोन लाख रुपयांचा विमा लाभ दिला जातो .कालाव थेट बँक खात्यात जमा केला जातो .अपघातामुळे किंवा एखाद्या आजारामुळे मृत्यू झाल्यावरही त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत केली जाते .
या योजनेचा लाभ कसा घ्यावा?
प्रधानमंत्री जीवन ज्योती (PMJJBY) विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुमचं बचत खातं राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकेत असणं आवश्यक आहे .त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन या योजनेचा अर्ज भरू शकतात .काही बँका ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही देतात .
अर्ज करत असताना तुम्हाला अर्जामध्ये नामनिर्दिष्ट व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचे आधार तपशील भरणे आवश्यक आहे .ही प्रोसेस एकदा केल्यावर,दरवर्षी फक्त हप्ता खात्यामध्ये असणे आवश्यक आहे .PMJJBY
खात्यात 435 रुपये असणे आवश्यक
जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला तर खात्यात वर्षातून एकदा 435 रुपये कट होतात यासाठी तुमच्या खात्यात 435 रुपये असणे आवश्यक आहे जर का एखाद्या वर्षी तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम उपलब्ध नसेल आणि तुमचा हप्ता खात्यामधून वसूल होऊ शकला नाही,तर त्या वर्षासाठी विमा संरक्षण लागू होत नाही.यामुळे तुमच्या खात्यात कमीत कमी 435 रुपये असणे खूप आवश्यक आहे.योजनेचे नूतनीकरण दरवर्षी होते यामुळे खातेदारांना कोणतेही वेगळे अर्ज परत परत भरण्याची गरज नसते.
या योजनेचा आणखीन एक फायदा म्हणजे कोणतीही वैद्यकीय चाचणी ची गरज नाही. तुम्हाला विमा घेण्यापूर्वी आरोग्य प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही.यामुळे कोणतेही प्रकारच्या गुंतवणुकी शिवाय या योजनेचा लाभ सहज उपलब्ध होतो .PMJJBY