Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : आयुष्यामध्ये कधी काय होईल हे सांगू शकत नाही. अचानक जर एखादा अपघात घडल्यास सर्वात जास्त कुटुंबाला पैशाची गरज असते .त्यामुळे अशावेळी प्रत्येकाने विमा संरक्षण घेणे किंवा आपत्कालीन निधी तयार ठेवणे खूप गरजेचे असते.मात्र, आजकालच्या धावपळीच्या जीवनात आणि वाढत्या महागाईमुळे मोठा निधी जमा करून ठेवणे हे तर सर्वसामान्य नागरिकांना शक्य होत नाही .अशा परिस्थितीमध्ये, विमा एक सर्वात चांगला उत्तम आणि परवडणारा पर्याय आहे .
यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) आर्थिक दृष्ट्या दुर्बळ नागरिकांसाठी एक मोठा आधार ठरत आहे .या योजनेचा वार्षिक प्रीमियम हा छोट्या व सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणार आहे .या योजनेचा वार्षिक प्रेमियम फक्त 20 रुपये आहे, दोन कप चहाच्या किमती पेक्षाही कमी आहे .म्हणजेच , तुम्हाला महिन्याला 2 रुपये पेक्षा कमी प्रीमियम मध्ये अपघाती विमा संरक्षण दिले जाते .Pradhan Mantri Suraksha Bima Yojana

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे काय?
केंद्र सरकारने देशातील गरिबाने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना कोणतेही अपघाताच्या परिस्थितीत आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे या योजनेची सुरुवात ही केंद्र सरकारने 9 मे 2015 रोजी केली आहे .ही योजना एक अपघाती विमा योजना आहे, जी अत्यंत कमी प्रीमियम मध्ये नागरिकांना अपघाताच्या परिस्थितीमध्ये आर्थिक मदत प्रदान करते .ज्या नागरिकांना मोठी विमा पॉलिसी घेणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे .Pradhan Mantri Suraksha Bima Yojana
प्रधानमंत्री विमा संरक्षण योजनेचे फायदे काय?
- या योजनेसाठी तुम्हाला फक्त वर्षाला 20 रुपये भरावे लागतात.
- या प्रीमियम मध्ये तुम्हाला 2 लाखापर्यंतचे अपघाती विमा संरक्षण दिले जाणार आहे
- जर एखाद्या अपघातामध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला, तर कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात .
- जर एखाद्या अपघातामध्ये विमाधारक पूर्णपणे अपंग झाला (उदा.दोन्ही डोळे, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावले) तर त्याला 2 लाख रुपये विमा दिला जातो .
- जर विमाधारक अंशतःअपंग झाला (उदा.एक डोळा, एक हात किंवा एक पाय गमावला) ,तर त्याला 1 लाख रुपये विमा संरक्षण मिळते .
- हा विमा दरवर्षी नूतनीकरण ( Renew) करता येतो .यामुळे तुम्हाला नियमितपणे सुरक्षा मिळत राहते .
- या योजनेअंतर्गत, प्रीमियमची रक्कम दरवर्षी विमाधारकांच्या आधार शी जोडलेल्या बँक खात्यातून आपोआप कट केली जाते .या योजनेची रक्कम ही दरवर्षी 1 जून पूर्वी खात्यातून वजा होते .Pradhan Mantri Suraksha Bima Yojana
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ कोणाला घेता येतो?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्ष दरम्यान असावे .70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही पॉलिसी आपोआप संपते .
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- प्रीमियमची रक्कम दरवर्षी बँक खात्यातून आपोआप कापण्यासाठी अर्जदाराने संमती देणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्तीचे कोणतेही बँकेत सक्रिय बचत खाते असणे गरजेचे आहे.
- जर कोणत्याही कारणामुळे अर्जदाराचे बँक खाते बंद झाले ,तर ही पॉलिसी देखील आपोआप रद्द होते .
- या पॉलिसीचा कव्हर कालावधी दरवर्षी 1 जून ते 31 मे पर्यंत असतो .
याचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
- या विमा योजनेसाठी अर्ज करणे अत्यंत सोपे आहे.
- तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत (ज्या बँकेत तुमचे बचत खाते आहे) अर्ज करू शकतात.
- बँकेकडून तुम्हाला या योजनेशी संबंधित फॉर्म मिळेल.
- या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक आणि व्यवस्थित भरा.
- आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार कार्ड बँक पासबुक) फॉर्म सोबत जोडून बँकेत जमा करावा .अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.