Pre school ragistation: पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांना नोंदणी करणे बंधनकारक….!

Pre school ragistation महाराष्ट्र राज्य शासनाने प्राथमिक शिक्षण पुरवणाऱ्या खाजगी केंद्र बाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. वय वर्ष तीन ते सहा या वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या राज्यातील सर्व खाजगी केंद्रांची नोंदणी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण पुरवणाऱ्या संस्थेचे सर्व तपशील जागा माहिती, शिक्षक / शिक्षिका आणि स्वच्छता याबाबतची सर्व तपशील माहिती आता पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र सरकारने 24 एप्रिल 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील तीन ते सहा वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांच्या नोंदणी बाबत सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

Pre school ragistation सरकारकडे शेतीमध्ये वय वर्ष तीन ते सहा वयोगटातील बालकांना खाजगी शिक्षण देणाऱ्या संस्थेची माहिती सरकारकडे उपलब्ध नसल्यामुळे सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. निर्णयाच्या माध्यमातून प्रत्येक खाजगी संस्थेची माहिती शासनाकडे उपलब्ध होईल तसेच पोर्टलच्या माध्यमातून पालकांना देखील प्रत्येक खाजगी शिक्षण देणाऱ्या संस्थेची माहिती पाहता येणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार कार्यवाही

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार शिक्षण संरचनेत 5+3+3+4 या प्रकारचा नवीन आकृतीबंध लागू करण्यात आला आहे. या मध्ये पहिल्या पाच वर्षात वय वर्ष तीन ते आठ वयोगटातील शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे. या तीन ते आठ वयोगटातील टप्प्याला पायाभूत स्तर असे नाव जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने पायाभूत स्तर साठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वर्ष तीन ते आठ या वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत आणि दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट शासनाने समोर ठेवले आहे.

नोंदणी प्रक्रिया कशी असेल Pre school ragistation

महाराष्ट्र राज्य शासनाकडून पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी केंद्रांना नोंदणीची सुविधा SARAL या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पोर्टल च्या माध्यमातून पुढील सात दिवसाच्या आत राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी संस्थांना आपली नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.

Pre school ragistation राज्यातील प्रत्येक पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी संस्थांची सर्वसाधारण माहिती, कार्यरत असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षिका यांची माहिती, संस्थेत उपलब्ध असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती,उपलब्ध असणाऱ्या भौतिक सुविधा या प्रकारची सर्व माहिती पोर्टलवर भरणे आवश्यक राहणार आहे.

दहावी बारावीचा निकाल या तारखेला लागणार

Leave a comment