prime minister internship scheme कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाकडून (MCA) प्रधान मंत्री इंटर्नशिप योजना २०२४ साठी नोंदणी प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२४ रोजी बंद केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइटवर थेट लिंक उपलब्ध आहे – pminternship.mca.gov.in.
जे उमेदवार या साठी पात्र असतील आणि त्यांना अर्ज करायचं आहे त्यांनी 10 नोव्हेंम्बर पूर्वी अर्ज सादर करावा. 10 नोव्हेंबर नंतर आपला नवीन अर्ज सादर करता येणार नाही.
prime minister internship scheme पात्रता निकष
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हायस्कूल, उच्च माध्यमिक शाळा पास असावी किंवा ITI, पॉलीटेक्निक डिप्लोमा, BA, B.Sc, B.Com, BCA, BBA, B.Pharma इत्यादी पदवी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत २१ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे.
- उमेदवार भारतीय असावा, पूर्णवेळ रोजगार नसावा तसेच पूर्णवेळ शिक्षणात गुंतलेला नसावा. ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण कार्यक्रमामध्ये नोंदणी केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची प्रक्रिया
१. pminternship.mca.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. “रजिस्टर” लिंकवर क्लिक करा; नवीन पेज उघडेल.
३. नोंदणीची माहिती भरा आणि सबमिट करा.
४. दिलेल्या माहितीनुसार, पोर्टलद्वारे एक रेझ्युमे तयार केले जाईल.
५. तुमच्या पसंतीनुसार (स्थान, क्षेत्र, कार्य भूमिका आणि पात्रता) ५ पर्यंत इंटर्नशिप संधींसाठी अर्ज करा.
६. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिट करा आणि पुष्टी पृष्ठ डाउनलोड करा.
७. भविष्यातील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.
अर्ज फी
prime minister internship scheme या योजनेसाठी कोणतेही नोंदणी किंवा अर्ज शुल्क नाही. नोंदणी प्रक्रिया अगदी मोफत आहे.
योजना उद्दिष्ट
या योजनेअंतर्गत, ५ वर्षांमध्ये १ कोटी पात्र उमेदवारांना देशातील सर्वात मोठ्या ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी, १.२५ लाख इंटर्नशिप संधी देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकार ने ठेवलेले आहे.
पीएम इंटरशिप योजना बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.