Rain Alert राज्यात पावसाचा अंदाज;येत्या दोन ते तीन दिवस विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Rain Alert : राज्यात उन्हाचा कडाका कायम आहे. तर राज्यातील काही भागात कालपासून ढगाळ हवामान दिसत आहे. तर कुठे कुठे उन्हाचा चटका ही जाणवत आहे.पन हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात एक ते दोन दिवसानंतर पावसाचा अंदाज वर्तवला आहे .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Rain Alert

या जिल्ह्यातील काही भागात ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज

हवामान विभागाने 19 मार्चपासून धुळे,नंदुरबार,जळगाव, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा (Rain Alert) अंदाज देण्यात आला आहे .तसेच जालना,परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे .

हे वाचा : ई – पीक पाहणीच्या नियमात होणार बदल !

20 मार्चला विजा आणि ढंगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा इशारा

तर चंद्रपूर,वर्धा,गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात विजा आणि ढंगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा (Rain Alert) येल्लो अलर्ट दिला आहे . यावेळी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारी वाहण्याची देखील शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

21 मार्चला काही जिल्ह्यात गडगडाटासह पावसाचा इशारा

21 मार्चला परभणी,हिंगोली,नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा (Rain Alert) अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे . तसेच भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे .

हवामान बदलांवर लक्ष ठेवण्याची गरज

राज्या मध्ये पुढील काही दिवस असेच तापमानवाढ कायम राहणार आहे , हवामान विभागाच्या अंदाजानुसार 19 मार्चनंतर काही ठिकाणी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवला आहे. त्यामुळे हवामान बदलांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. Rain Alert

1 thought on “Rain Alert राज्यात पावसाचा अंदाज;येत्या दोन ते तीन दिवस विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज”

Leave a comment

Close Visit Batmya360