PM Kisan पीएम किसान योजनेचे पैसे मिळणे बंद झाले आहेत; तर काय असू शकते या मागचे कारण? पहा सविस्तर

PM Kisan : पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या अंतर्गत एक केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे जी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना उत्पन्नाचा आधार देते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 रोजी राबवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना दरवर्षी तीन सन्मान हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात. अनेक नागरिकांचे पीएम किसान योजनेचे पैसे मिळणे बंद झाले आहे तर काय असू शकते या मागचे कारण या लेखांमध्ये आपण जाणून घेऊया.

राज्याचा रहिवासी नाही, दोन वेळा नोंदणी, निमशासकीय कर्मचारी, संविधानिक पदावरील व्यक्ती, सज्ञान नसलेले, याशिवाय भारतातील निवासी नसणे असे असे अनेक शेतकरी पी एम किसान योजनेचे अपात्र ठरलेले आहेत. अशा या अपात्र शेतकऱ्यापर्यंत जाऊन नव्याने कागदपत्र घेतली जात आहे. या योजनेच्या लाभासाठी पात्र की अपात्र हे समितीने अद्याप ठरविले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PM Kisan

या योजनेसाठी पात्रता काय आहे

पंतप्रधान किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेसाठी 1 फेब्रुवारी 2019 अगोदर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे अशे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. ही योजना सुरू करताना ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स दिल्या होत्या ते सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान (PM Kisan) सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे

हे वाचा : शेतकऱ्यांनो शेतकरी ओळख पत्र काढले का ? येथे पहा शेतकरी ओळखपत्र यादी.

अर्ज करून देखील अपात्र ठरण्याचे कारण

अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला अर्ज केला होता परंतु बँक पासबुक आणि आधार कार्ड दिले नव्हते. गाव पातळीवर तलाठी, कोतावलांनी वारंवार मागणी केल्यानंतरही शेतकऱ्यांनी दिले नव्हते.
पण ज्यावेळेस राज्य शासनाने प्रति वर्ष 6 हजार रुपये जाहीर करण्यात आले. त्यावेळेस राहिलेल्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड आणि बँक पासबुक देण्याची तयारी दर्शविली. कागदपत्रे दिली पण मात्र महसूल कृषी खात्याकडून तपासणी करण्यात आली. त्यावेळी वेगवेगळ्या कारणामुळे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. या अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या गावपातळीवर कृषी सहाय्यकाकडे तपासणीसाठी देण्यात आले आहेत.PM Kisan

शेतकरी कोणत्या कारणामुळे ठरत आहेत अपात्र?

  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी नसणे.
  • संविधानिक पदावर असताना लाभ घेतलेला शेतकरी.
  • दोनदा नोंदणी करण्यात आलेला शेतकरी.
  • स्थानिक राज्य संस्था निमशासकीय कर्मचारी.
  • जमीन विक्रीमुळे भूमिहीन झालेला शेतकरी.
  • माजी संविधानिक पदावरील व्यक्ती.
  • अगोदर कुटुंब प्रमुखास लाभ मिळत आहे.
  • संस्था मालकी असलेला जमीनधारक शेतकरी
  • 1 फेब्रुवारी 2019 नंतरचा जमीन धारक शेतकरी.
  • जमिनीची मालकी स्वतःच्या नावाने नसलेला शेतकरी.
  • शेती शिवाय इतर कारणासाठी वापरणारे जमीनधारक शेतकरी.
  • भारतीय अनिवासी शेतकरी.
  • नोंदणीकृत व्यवसायिक
  • सेवानिवृत्ती लाभधारक
  • ओळख न पडलेले शेतकरी
  • सज्ञान नसलेले
  • वर्गीकरण न केलेले लाभार्थी
  • खोट्या माहितीवर नोंदणी
  • आया कर भरणारे शेतकरी.

तपासणी सुरू

अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैक काही शेतकऱ्यांनी पुन्हा कागदपत्रे सादर केली आहेत, तर काही शेतकऱ्यांची तपासणी सुरू आहे. असे कृषी खात्याकडून सांगण्यात आले आहे. कृषी आयुक्त कार्यालयाकडून तपासणी झाल्यानंतरच पात्र किंवा अपात्र दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.अपात्र ठरलेल्या याद्या गाव पातळीवर पाठवण्यात आल्या आहेत. कृषी सहाय्यक तपासणी करून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव पुन्हा सादर करण्या स सांगणार आहेत .

जे शेतकरी शासनाच्या निकषात या योजनेसाठी बसत नाहीत, अशे शेतकरी अपात्र ठरविले जाणार आहे. अपात्र शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करू नयेत. अडचण आल्यास कृषी सहाय्यकांना संपर्क करावा.PM Kisan

Leave a comment