11th admission 11 वी प्रवेश प्रक्रिया होणार ऑनलाइन पद्धतीने. अशी असेल प्रक्रिया.

11th admission नमस्कार विद्यार्थी/ पालक मित्रांनो,दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दहावीचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर झाला. दहावीचा निकाल लागल्यानंतर अनेक जण अकरावीच्या प्रवेशाची वाट पाहत असतात. याआधी फक्त मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती या पाच शहरांमध्येच 11वीचा प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होत होता. मात्र यंदा, 2025–26 या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व कॉलेजसाठी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच राबवली जाणार आहे. त्यामुळे आता कोणालाही कॉलेजमध्ये जाऊन ऑफलाइन फॉर्म भरायचा नाही. सगळं काही मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरच होणार आहे.

11th admission

कुठे करायचं रजिस्ट्रेशन?

खूप विद्यार्थी अजूनही जुनी वेबसाईट https://11thadmission.org.in ओपन करतात. पण लक्षात ठेवा, ही जुनी वेबसाईट आता बंद करण्यात आली आहे.
याऐवजी नवीन वेबसाईट –
👉 https://mahafyjcadmissions.in
हीच अधिकृत वेबसाईट आहे, जिथून तुम्ही अर्ज करू शकता.

11वी ऑनलाईन प्रवेशाचे अधिकृत वेळापत्रक (2025–26) 11th admission

शालेय शिक्षण विभागाने खालीलप्रमाणे वेळापत्रक जाहीर केलं आहे:

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
टप्पामाहितीदिनांक
1.शाळांची माहिती पोर्टलवर भरणे08 मे ते 15 मे 2025
2.माहितीची अधिकाऱ्यांकडून पडताळणी08 मे ते 16 मे 2025
3.विद्यार्थी प्रोफाइल तयार करणे19 मे ते 28 मे 2025
4.प्राधान्यक्रम (कॉलेज निवड) भरणे19 मे ते 28 मे 2025
5.मेरिट लिस्ट फेऱ्या (Round 1 ते Round 4)प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर
6.OPEN FOR ALL फेरी (सर्वांसाठी खुली)शेवटी
7.वर्ग सुरू होण्याची तारीख11 ऑगस्ट 2025 (किंवा शासन ठरवेल त्या दिवशी)

अर्ज करताना कोणते कागदपत्र लागतात?

11th admission ऑनलाइन अर्ज करताना खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात:

  • दहावीची मार्कशीट / दहावी चा रोल नंबर.
  • आधार कार्ड
  • मोबाइल क्रमांक
  • ईमेल आयडी
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नॉन क्रिमिलीयार प्रमाणपत्र (OBC साठी)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अपंगत्व प्रमाणपत्र / क्रीडा पात्रता /अनाथ /माजी सैनिक / इतर सर्टिफिकेट (जर लागू असेल)

11th admission अर्ज कसा करायचा?

  1. https://mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर लॉगिन करा.
  2. “New Registration” वर क्लिक करा.
  3. तुमचं नाव, मोबाईल नंबर, ई-मेल, दहावीचं बोर्ड, सीट नंबर इ. माहिती भरा.
  4. एक पासवर्ड तयार करा आणि रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
  5. लॉगिन करून तुमचं प्रोफाइल भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायचं आहे ती प्राधान्यक्रमानुसार निवडा.
  7. मेरिट लिस्ट लागल्यानंतर प्रवेश फिक्स करा.

महत्त्वाची सूचना

  • प्रवेशासाठी फक्त ऑनलाइन अर्जच स्वीकारले जातील.
  • कोणतेही कॉलेज ऑफलाइन अर्ज स्वीकारणार नाही.
  • सर्व माहिती काळजीपूर्वक वाचूनच फॉर्म भरा.

निष्कर्ष

11वी प्रवेशासाठी यावर्षीपासून पूर्णपणे ऑनलाईन प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 19 मे 2025 पासून सुरू होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर अर्ज भरणे आवश्यक आहे.
जर तुम्ही अद्याप तयारी केली नसेल, तर आता वेळ वाया न घालवता, तुमची कागदपत्रे तयार ठेवा, अर्ज सुरू झाल्यावर आपणास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

Leave a comment