Shet Rasta News : पाणंद व शेत रस्ता मोजणी फि रद्द करण्यात आली आहे आता ही मोजणी मोफत केली जाणार आहे . अनेक ठिकाणी शेत रस्त्यावरून वादविवाद होतच राहत असतात .विशेषता: पावसाळा तोंडावर आला की हे वाद खूप जास्त प्रमाणांत वाढतात .मग मात्र अशावेळी क्षेत्र रस्ता मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख ‘विभागाकडे मोजणी फी भरून रस्ता मोजनी करवा लगत होता .

परंतु हा रस्ता मोजताना पण मोजणी फी कोणी भरावी यामध्ये देखील वाद विवाद होत होता.मात्र,आता शेतातील रस्ता मोजणी फी रद्द करण्यात आली आहे .म्हणजेच याचा अर्थ असा की,शेत रस्ता मोजणी मोफत केली जाणार आहे.
पूर्वी रस्ता मोजणी करून आपली हद्द कायम करण्यासाठी रस्ता मोजणी फी भरावी लागत होती परंतु आता मात्र ही फी माफ करण्यात आली आहे .इथून पुढे शेतात जाणारा रस्ता किंवा पानंद रस्ता मोजणी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही .Shet Rasta News
तुमचा शेत रस्ता अडवल्यास करा कायदेशीर कार्यवाही
यंदा लवकरच पावसाळा सुरू होत आहे यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामांना वेग आणला आहे . उन्हाळा असल्यास शेतात वाहन नेताना कोणत्याही शेतकऱ्यांच्या खाली रस्त्यातून वाहना नेता येते .परंतु पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतात जाण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या रस्त्यावरूनच जावे लागते .
शोतरस्ता की माफ केल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे
जर एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी नकाशावर अगोदरच रस्ता उपलब्ध असेल आणि तो रस्ता एखाद्या शेतकऱ्यांनी अडविला असेल तरअशावेळी त्या नागरिकांना मालमत्तेदार कोर्ट कायदेनुसार तहसीलदार यांच्याकडे रस्ता मागणी अर्ज करता येतो. Shet Rasta News
एखाद्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर नवीन रस्ता मिळू शकतो का?
प्रत्येक आपल्या शेतात जाण्यासाठी शेत रस्ता असणे खूप महत्त्वाचे आहे.वरती सांगितल्याप्रमाणे जर शेत नकाशावर प्रस्ताव उपलब्ध असेल आणि तो कोणी अडविला असेल तर अशा परिस्थितीमध्ये कायदेशीर पद्धतीने रस्ता मोकळा करता येऊ शकतो .
पण मात्र,जर तुम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नवीन रस्ता पण मिळू शकतो .
1966 च्या महाराष्ट्र जमीन अधिनियमानुसार कलम 143 नुसार शेतात जाण्यासाठी लागणाऱ्या रस्त्यासाठी तहसीलदार यांच्याकडे मागणीकरता येते. Shet Rasta News