शेत रस्ता कायदा shet rasta kayda
शेत रस्ता कायदा shet rasta kayda
Table of Contents
Toggleनमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण या लेखामध्ये शेत रस्ता कायदा म्हणजे काय आहे हे पाहणार आहोत. आपण बघितलेच आहे की बऱ्याच वेळा जमिनीमुळे बांधा बांधामुळे रस्त्यामुळे शेतामधून चालत जाण्यामुळे शेजाऱ्या शेजाऱ्याचे भांडण होत असते. गावातील शेत रस्त्यामुळे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे नेहमीच वाद होत असतात.
गावाकडील लोकांना शेतात जाण्यासाठी त्यांच्या स्वतःचा हक्काचा रस्ता पाहिजे हक्काचा रस्ता असल्यामुळे शेत रस्त्यावरून वाद कमी होतील. यासाठी शासनामार्फत काही कायदेशीर तरतुदी करण्यात आलेले आहेत. शेत रस्ता अडवणी शेतात जाण्यासाठी अडचणीने तसेच आपण बरेच वेळा बघितले की आज सध्याच्या काळामध्ये शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा उपयोग केला जातो जसे की, पाळी, पेरणी, नांगरणी, कापणी, इतर सर्व कामे यंत्र मार्फतच केली जातात त्यामुळे शेतकऱ्यांना बारा महिने म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये शेतात रस्त्याची अत्यंत आवश्यकता असते त्यामुळे शेतात शेत रस्ता , शिव रस्ता ,पाऊल रस्ता इत्यादी सर्व रस्ते शेतासाठी कामा ला उपयोगी येतात . पण या रस्त्यामुळे शेजाऱ्या शेजाऱ्यांमध्ये वाद निर्माण होत असतात .
ग्रामीण भागातून शेत रस्ते/ पाणांद रस्ते याची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे ही मागणी शेतकऱ्याद्वारे वाढत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने शेती रस्त्याची महत्त्व लक्षात घेऊन पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना राबवण्याची सुरुवात डिसेंबर 2018 पासून तर मातोश्री ग्राम समृद्धी शेत / पाणांद रस्ते योजना नोव्हेंबर 2021 पासून राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
शेतीसाठी रस्त्याचे महत्त्व
सध्याच्या काळामध्ये वाढती शेतमजुरी तसेच मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेक शेतकरी यांत्रिकीकरणाचा उपयोग करत असतात . त्यामुळे शेतातील सर्व कामे यंत्रमार्फत केली जाते यंत्रमार्फत शेतातील कामे केल्यामुळे यंत्र, अवजारे शतकापर्यंत नेण्यासाठी चांगला रस्ता असणे आवश्यक आहे. तसेच शेतातील झालेला माल नेण्यासाठी ट्रॅक्टर किंवा वाहन नेण्यासाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता असते. शेतामधील रस्ता मिळवण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या शेत रस्त्यातील अतिक्रमण मोकळे करण्यासाठी दोन प्रकारच्या कायदेशीर तरतुदीने रस्ता मिळवण्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो .
शेतासाठी रस्ता मिळवण्याची पहिली तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 नुसार, तुम्ही दुसऱ्याच्या शेतातून तुमच्या शेतात जाण्याकरता 100% रस्ता मिळू शकतात. यासाठी तहसीलदार तुम्हाला तुमच्या बांधावरून रस्ता मिळवून देऊ शकतो. तुम्हाला तहसीलदाराकडे तुमच्या शेती करता शेत रस्ता मिळवण्यासाठी विनंती अर्ज करावा लागेल. म्हणजे ज्या शेतकऱ्यांची रस्त्याची समस्या आहे त्या शेतकऱ्यांनी शेतातून जाण्याकरता रस्ता पाहिजे किंवा आम्हाला आमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा अशी विनंती या अर्जात तुम्हाला करावी लागेल .
तरतुदीनुसार मालमत्तादार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 नुसार शेतीसाठी पारंपारिक अस्तित्वात असणारा रस्ता याला अडथळा निर्माण करणे याविरुद्ध सहा महिन्यांच्या आत दावा दाखल करता येतो .मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 अन्वयेकामकाज दिवाणी न्यायालया प्रमाणे चालवले जाते हा कायदा फक्त शेतजमिनी साठीच लागू आहे
शेत रस्ता कायदा shet rasta kayda
जमीन महसूल अधिनियम कायदा 1966 च्या कलम 143: कागदपत्रे
- अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील तीन महिन्याच्या आतील सातबारा देणे गरजेचे आहे.
- अर्जदाराच्या शेत जमिनीचा शासकीय मोजणीचा नकाशा असल्यास तो नकाशा द्यावा लागेल.
- गाव नकाशाची प्रत अर्जदार शेतकऱ्यांच्या लगतच्या शेतकऱ्याची नावे पत्ते व त्यांच्या जमिनीचा तपशील.
- जर अर्जदाराच्या जमिनीबाबत न्यायालयात काही वाद सुरू असतील तर त्याची माहिती कागदपत्रासह तहसीलदारांना द्यावी लागेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- शेत रस्ता अडवल्यास काय करावे?
- शेत रस्ता अडवल्यास आपण आपल्या तहसीलदार कार्यालयात रीतसर अर्ज करुन रस्ता मिळावु शकता.
2. शेजारी शेतरस्ता अडवल्यास काय करता येते ?
- शेजाऱ्याने जर आपला शेत रस्ता अडवला तर आपण त्याच्याशी वाद न करता आपण रीतसर तहसीलदार यांना अर्ज करावा.
शेत रस्ता कायदा अर्ज प्रक्रिया
अर्जाची प्रक्रिया शुल्क म्हणून, अर्जदाराला योग्य मूल्या च्या कोर्ट फी वर स्टॅम्प लावून तोच द्यावी लागेल. तुम्हाला अर्जाच्या आणि संबंधित कागदपत्राच्या जितक्या प्रती उत्तरे द्यायचे आहे तितक्या जमा कराव्या लागतील.
तर मित्र आणि मैत्रिणींनो जर तुमचा शेतातील जाणारा रस्ता अडवला असेल तर, किंवा तुम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता हवा असेल तर आपल्याला कशाप्रकारे अर्ज करायचा आहे . याबद्दलची माहिती आपल्याला अडवलेला रस्ता किंवा शेतात जाण्यासाठी लागणारा रस्ता मिळवण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल.
धन्यवाद!
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.