कापूस सोयाबीन अनुदान संकेतस्थळ उपलब्ध पहा सविस्तर माहिती

कापूस सोयाबीन अनुदान संकेतस्थळ उपलब्ध

   राज्यातील शेतकऱ्यांना सरकार कडून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 5000 रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. 

   कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी सरकार कडून ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या व त्या शेतकऱ्यांना आधार सहमति पत्र भरून देण्याबाबतच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

    कापूस सोयाबीन अनुदान संकेतस्थळ देण्यात आले आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद ई पिक पाहणी द्वारे केलीली आहे परंतु त्यांचे अनुदान यादी मध्ये नाव आले नाही अश्या शेतकाऱ्यासाठी आता सरकार ने सातबारेवर नोंद असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ई पिक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार का ?

    ज्या शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी केली नाही अश्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार का ? या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांनी सातबारेवर नोंद केली आहेअश्या सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. परंतु या मध्ये महत्वाची माहिती म्हणजे सातबारेवर पिकाची नोंद करण्यासाठी ई पिक पाहणी करणे गरजेचेच आहे. 

  • ज्या शेतकऱ्याच्या पिकाची नोंद (कापूस किंवा सोयाबीन) सातबारेवर नाही अश्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही हे मात्र नक्कीच. 
  • मात्र ज्या शेतकऱ्यांचे नाव याधी मध्ये नाही परंतु त्यांनी आपल्या पिकाची नोंद (कापूस किंवा सोयाबीन )सातबारेवर केलेली आहे अश्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे. 

अनुदान साठी नविन पोर्टल

कापूस सोयाबीन अनुदान संकेतस्थळ

  कापूस सोयाबीन अनुदान संकेतस्थळ उपलब्ध​

शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी सरकार कडून नवीन पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. पोर्टल ची लीक _ https://scagridbt.mahait.org/

     या पोर्टल वर अधिकारी लॉगिन उपलब्ध करण्यात आली आहे. अधिकारी यांना शेतकाऱ्याच्या खाते क्रमांकाला आधार लिंक करण्यासाठी पर्याय देण्यात आला आहे.

कापूस सोयाबीन अनुदान संकेतस्थळ

  सध्या शेतकरी अनुदान तपशील दिसत नाही लवकरच ती माहिती देखील या संकेतस्थळावर दिसून येईल त्या करिता काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

3 thoughts on “कापूस सोयाबीन अनुदान संकेतस्थळ उपलब्ध पहा सविस्तर माहिती”

Leave a comment