Rain Alert राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट जारी; वादळ, वारे, विजांसह गारपिटीचा इशारा,हवामान विभागाचा अंदाज

Rain Alert : राज्यात हवामानामध्ये मोठा बदल होत असताना पाहायला मिळत आहे . मराठवाडा,मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पाऊस सुरूच आहे . गारपिट मुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. IMD ने 4 एप्रिल रोजी म्हणजेच आज हाय अलर्ट (High alert) जारी केला आहे.

मराठवाड्याला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय. त्याबरोबरच राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडताना दिसत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. मराठवाड्यामध्ये तर अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. Rain Alert

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Rain Alert

IMD ने दिलेल्या माहितीनुसार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या अवकाळी पावसाचे ढग कायम असल्याचे पाहायला मिळते . सध्या पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झाले आहे. आजही राज्यात हाय अलर्ट (High alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला IMD ने दिला आहे.

हे वाचा : कापूस ,सोयाबीनच्या दरात वाढ, तर काय आहे लिंबाचे दर… पहा पुढील हप्त्यात कसा राहणार बाजार भाव?

वाऱ्याची दिशा

सध्या चक्रकार वारे वाहत आहेत. हे चक्रकार वारे वाहत असल्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्प वाऱ्यामुळे संगम होत आहे. मुंबईतही आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. Rain Alert

अवकाळी पावसाची स्थिती

सध्या अवकाळी (Rain Alert) पावसामुळे रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या संभाजीनगर जिल्ह्यात पण अवकाळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. होळी झाल्यानंतर पारा वाढणार असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. परंतु कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अवकाळी पावसाची स्थिती सध्या निर्माण झाली आहे असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

या भागाला यलो अलर्ट

आज 4 एप्रिल रोजी राज्यात मध्य महाराष्ट्र , कोकण आणि मराठवाड्यात हवामान खात्याकडून यलो (Yellow alert) अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागामध्ये वादळी वाऱ्यासह, विजा, ढगांचा कडकडाटत पाऊस होईल. याबरोबरच काही भागांमध्ये गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे.Rain Alert

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सल्ला

राज्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain Alert) आणि गारपीटीची शक्यता आहे, लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची काढणी करून घ्यावी किंवा काढणी केलेला माल व्यवस्थित ताडपत्रीने झाकून ठेवा .अनेक शेतकऱ्यांचे गहू काढणे, बाजरी,ज्वारी ,हरभरा , कांदा, यासारखे अनेक पिकं सध्या काढणे सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज लक्षात घेऊन आपल्या पिकाची योग्य ती काळजी घ्यावी जेणेकरून पावसाने भिजणार नाही याची दक्षता घ्यावी ,असा सल्ला IMD ने देण्यात आला आहे . Rain Alert

Leave a comment