Ration Card तुमच्या गावच्या रेशन कार्ड यादी मध्ये तुमचे नाव आहे का? घरबसल्या फक्त 2 मिनिटात… मोबाईलवर तपासा

Ration Card : रेशन कार्ड हे देशातील प्रत्येक कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे कागदपत्रे मानले जात आहे. सुरुवातीला हे रेशन कार्ड फक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना स्वस्त दरात अन्नधान्य देण्यासाठी याचा उपयोग केला जात असे, परंतु आता हे राशन कार्ड सर्व नागरिकांचे एक ओळखपत्र म्हणून वापरले जाऊ लागले आहे. जसे कोणत्याही शासकीय कामासाठी आधार कार्ड वापरले जातात तसेच आता रेशन कार्ड ही महत्त्वाचे कागदपत्र मानले जात आहे. आता प्रत्येक शासकीय कामकाजासाठी रेशन कार्ड (Ration Card) खूप महत्त्वाचे आहे.

Ration Card

तुमच्या गावातील रेशन कार्ड यादी ऑनलाईन पद्धतीने पहा

सध्या शासनाने सर्व सेवा आणि कागदपत्र प्रणाली ऑनलाइन केल्यामुळे, आता तुम्हाला कुठेही जाऊन तपासाची गरज नाही. आता नागरिकांना घरी बसल्या विविध प्रकारचे कागदपत्रे बघता येतात व अर्ज पण करता येतो. छोट्या छोट्या कामासाठी आता तुम्हाला कोणतेही कार्यालयात जाऊन गर्दी करण्याची गरज नाही. तसेच तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल मध्ये ऑनलाईन पद्धतीने तुमच्या गावातील रेशन कार्ड यादी सहज पाहू शकतात. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा .Ration Card

  • यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या अधिकृत https://rcms.mahafood.gov.in/वेबसाईटवर जावे लागेल.
  • ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम स्क्रीनवर दिलेला कॅप्टचा (Captcha) टाकून घ्यावा लागेल.
  • कॅप्टचा भरून घेतल्यानंतर तुम्हाला व्हेरिफाय (Verify) या बटनावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड लिस्ट महाराष्ट्र (Ration Card List Maharashtra) हा पर्याय निवडून घ्यावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला पुढे स्टेट (State) मध्ये महाराष्ट्र निवडून घ्यावी लागेल.
  • राज्य निवडल्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला District म्हणजे तुमचा जिल्हा, DFSO (District Food Supply Office) आणि स्कीम (Scheme) मध्ये सिलेक्ट ऑल (Select All ) हा पर्याय निवडून घ्यायचा असतो.
  • त्यानंतर View Report यावर क्लिक केल्यावर कलेक्टर ऑफिस (Collector Office) (Branch Supply) वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही तुमचा तालुका निवडा.
  • तालुका निवडून घेतल्यानंतर तुम्हाला तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानाचे यादी दिसेल.
  • यातून तुम्हाला तुमचे गाव आणि गावातील स्वस्त धान्य दुकान निवडून क्लिक करायचे आहे. क्लिक करतात तुमच्या संपूर्ण गावाची रेशन कार्ड यादी तुमच्या मोबाईलवर ओपन होईल.
  • त्यानंतर ही यादी पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला सेव्ह (Save) किंवा एक्सपोर्ट (Export) या बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करता येते.
  • अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावाची रेशन कार्ड यादी सहज पाहू शकतात.

हे वाचा : जिवंत सातबारा मोहीम सुरु! असा घ्या लाभ…

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

जर तुमच्याकडे रेशन कार्ड (Ration Card) नसेल तर, ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून देखील मिळवता येते. यासाठी तुम्हाला NFSA या वेबसाईटवर रेशन कार्ड साठी अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा ते पाहूया.

  • रेशन कार्ड ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम https://nfsa.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर ती वेबसाईट ओपन करून रेशन कार्ड या विभागात जावे लागेल.
  • त्या पर्यायावर गेल्यानंतर स्टेट पोर्टल रेशन कार्ड डिटेल्स ( State portal ration card Details) हा पर्याय निवडून, राज्याचे नाव (उदा. महाराष्ट्र) निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्याच्या अन्न व नगरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर पुननिर्देशित केले जाईल .
  • त्यानंतर तेथे डाऊनलोड करून(Download Form) या मेनूवर क्लिक करून तुम्हाला शहरी अथवा ग्रामीण भागासाठी योग्य तो रेशन कार्ड अर्ज फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.
  • वरून डाऊनलोड करून घेतल्यानंतर त्याची प्रिंट काढून आवश्यक ती माहिती व्यवस्थित भरून घ्यावी.
  • फॉर्ममध्ये माहिती भरून घेतल्यानंतर आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे जोडून घ्यावेत.
  • कागदपत्रे जोडून घेतल्यानंतर अन्न व पुरवठा कार्यालयात तो अर्ज सादर करावा.
  • अर्ज सादर करताना त्याची एक पोच पावती दिली जाते, तिच्या मदतीने अर्जाचा मागोवा घेता येतो.
  • मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसात तुमचे नाव रेशन कार्ड (Ration Card) यादी मध्ये समाविष्ट होईल.

रेशन कार्ड साठी पात्रता काय?

  • रेशन (Ration Card) कार्ड यासाठी अर्ज करत असताना नागरिकांनी पात्रता आणि निकष लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे.
  • सर्वप्रथम, भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • शिधापत्रिका ही कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या नावाने जारी केली जाते आणि त्या व्यक्तीचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असावे.
  • कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट केली जातात.
  • अर्जदार व्यक्तीकडे दुसऱ्या राज्यात आधीपासून रेशन कार्ड नसावे.
  • त्यानंतर, कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नावर आधारित कार्डाचा प्रकार ठरवला जातो. Ration Card


Leave a comment