जिवंत सातबारा मोहीम जमिनीच्या मालकी हक्कामध्ये मयत व्यक्तींचे नावे सातबारा उताऱ्यावर नोंद असल्यामुळे मालकी हक्कांमध्ये विविध अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींना दूर करण्यासाठी राज्य शासनाने राज्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही मोहीम एक एप्रिल 2025 पासून संपूर्ण राज्यभर राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या अंतर्गत मयत व्यक्तींच्या नावावर असणारी जमीन त्यांच्या वारसांच्या नावावर मोफत करून देण्याची सुविधा राबवण्यात येणार आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मोहीम राज्यात एक एप्रिल 2025 पासून राबवण्यास मान्यता देण्यात आली. या मोहिमेमध्ये वयाची व्यक्तींच्या नावावर असलेली जमीन त्यांच्या वारसाच्या नावे करण्यात येणार आहे.
वारस नोंदीची प्रक्रिया मृत व्यक्तीच्या जमिनीवर वारसाच्या हक्क लावणे ही प्रक्रिया अत्यंत अडचणीची असल्यामुळे अनेक वारसांन मयत व्यक्तीच्या नावावरील जमीन आपल्या नावावर करण्यासाठी विविध अडचणी निर्माण होतात. याचाच विचार करून राज्य शासनाने राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणार आहे. वारसांच्या नावे जमीन करण्याची प्रक्रिया दीड महिन्याच्या आत पूर्ण केली जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे काय होइल फायदा
- अधिकृत असणाऱ्या वारसांची नोंद सातबारावर होणार आहे.
- खरेदी विक्री करण्यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील.
- शेती विषयक अनुदान पीक कर्ज पिक विमा यासारख्या योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.
- वारसा मधील वारसा हक्क संदर्भातील निर्माण होणारे वाद देखील टाळता येतील.
जिवंत सातबारा मोहीम महत्त्वाच्या तारखा
1 एप्रिल 2025 पासून ही मोहीम सुरू केली जाणार आहे. 1 एप्रिल ते 5 एप्रिल पर्यंत तलाठी यांच्या माध्यमातून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करून चावडी वाचन केले जाईल. 6 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान वारस यांना आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. 21 एप्रिल ते 10 मे 2025 पर्यंत ई फेरफार प्रणाली द्वारे सातबारावर वारसांचे नावे अधिकृत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला
- वारस प्रमाणपत्र
- वारस प्रमाणपत्र बाबत सरपंच ,ग्रामसेवक, पोलीस पाटील यापैकी एकाचा दाखला.
- सर्व वारसदारांची वैयक्तिक माहिती (वारसाचे नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी)
प्रक्रिया संपुर्ण मोफत
जिवंत सातबारा मोहिमे अंतर्गत वारस हक्काने जमीन नावावर करण्यासाठी वारसांना कोणत्याही प्रकारचा शुल्क भरावा लागणार नाही. ही प्रक्रिया मोफत केली जाणार आहे. महसूल विभागाने याबाबत जाहीर केले आहे की कोणत्याही दलला किंवा अधिकाऱ्याला पैसे देऊ नयेत. ही प्रक्रिया पूर्णतः मोफत पूर्ण केली जाणार आहे.