mahavitarna farmer announcement शेतकऱ्यानी कृषी पंपांना ऑटो स्विच ऐवजी कॅपॅसिटर बसवण्याचा सल्ला

mahavitarna farmer announcement महावितरणकडून कृषी पंपांना योग्य वीज पुरवठा करण्यासाठी ऑटो स्विचऐवजी कॅपॅसिटर बसवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कृषी पंपांवर ऑटो स्विचचा वापर केल्यामुळे होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि वीज पुरवठा सुरळीत व योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळवावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी पंपांना ऑटो स्विच ऐवजी कॅपॅसिटर बसवून सहकार्य करावे, असे सल्लारुपी अहवाल महावितरणच्या छत्रपती संभाजी नगर परिमंडळाने केले आहे.

ऑटो स्विच वापराचे तोटे mahavitarna farmer announcement

शेतकऱ्यांनी कृषी पंपांवर ऑटो स्विच बसवल्यास वीज पुरवठा सुरू होताच पंप आपोआप सुरू होतात, परिणामी:

  1. परिसरातील सर्व पंप एकाच वेळी सुरू होतात, ज्यामुळे रोहित्रांवरील भार अचानक वाढतो.
  2. यामुळे रोहित्र जळणे किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढते.
  3. वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होतो.
  4. वीज दुरुस्तीचा कालावधी वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

कॅपॅसिटर वापरण्याचे फायदे

कृषी पंपांना क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसवणे अनेक समस्यांचे समाधान करू शकते:

  • कॅपॅसिटर वापरण्याचे रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी होते.
  • वीज पुरवठ्यातील दबाव कॅपॅसिटर वापर मुळे नियंत्रित राहतो.
  • कमी दाबाचा वीज पुरवठा सुधारणे शक्य होते.
  • रोहित्र जळल्यास किंवा नादुरुस्त झाल्यास त्याच्या दुरुस्तीचा कालावधी कमी होतो.
  • वीज पुरवठा सुरळीत राहून शेतीला नियमित पाणीपुरवठा मिळू शकेल .

महावितरणचा सल्ला

  1. कॅपॅसिटर बसवणे: प्रत्येक कृषी पंपावर क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसवावा.
  2. दुरुस्ती आवश्यक आहे: बसविलेले कॅपॅसिटर बंद असल्यास किंवा थेट जोडणी असेल तर त्यांची त्वरित दुरुस्ती करावी.
  3. ऑटो स्विच टाळा: वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऑटो स्विचचा वापर टाळावा.

ऑटो स्विच वापरणे टाळा

mahavitarna farmer announcement महावितरण कडून कृषी सौर पप्पांना दिवसा व रात्र अशा चक्रकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येतो आणि वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन कृषी पंप चालू करण्याचा त्रास वाचवण्यासाठी काही ठिकाणी कृषी पंपांना ऑटो स्विच चा वापर केला जातो. ज्यामुळे वीज येतात कृषी पंप ऑटोमॅटिक चालू होतो. पण , याचे परिणाम रोहीत्रांवरील भार एकाच वेळी वाढतो ज्यामुळे रोहित्र जळण्याची किंवा नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहेत . त्यामुळे ऐन हंगामामध्ये रोहीत्र जळाल्यास शेतकऱ्यांच्या पिकाला वेळेवर पाणी नाही मिळाल्यास पिकाचे नुकसान होऊ शकते ,त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑटो स्विच वापरणे टाळावे .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे उपाय

  • कृषी पंप सुरू करण्यासाठी चक्राकार पद्धतीने वीज पुरवठ्याचा विचार करावा.
  • वीजपुरवठा सुरू झाल्यावर स्वतः जाऊन पंप सुरू करावा, ऑटो स्विचचा अवलंब करू नये.
  • कॅपॅसिटर नियमितपणे तपासून योग्य स्थितीत ठेवावे.

निष्कर्ष

mahavitarna farmer announcement कृषी पंपांसाठी कॅपॅसिटरचा वापर करणे गरजेचे आहे ज्या मुळे रोहित्रांवरील ताण कमी होण्यास मदत होते आणि वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचा सोपा व प्रभावी उपाय आहे. शेतकऱ्यांनी या उपायाचा अवलंब केल्यास शेतीसाठी आवश्यक वीज पुरवठा नियमित व योग्य दाबात मिळू शकेल. असे , आवाहन महावितरण ने केले आहे या मुळे महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य करणे गरजेचे आहे.

Leave a comment