ration card: आजच करा हे काम!..अन्यथा रेशन कार्ड होणार रद्द..!

ration card : राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांची तपासणी मोहीम सुरू करण्याची हाती घेण्यात आले आहे. राज्यामध्ये एक एप्रिल पासून ते 31 मे पर्यंत ही मोहीम सुरू ठेवली जाणार आहे. या काळामध्ये राज्यातील रेशन कार्ड धारकांना आपल्या रहिवासी पुराव्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रहिवासी पुरावा न देऊ शकणाऱ्या शिधापत्रिका धारकांचे रेशन कार्ड थेट रद्द केले जाणार आहे.

ration card

ration card रेशन कार्ड विशेष मोहिम

सरकारकडून रेशन धान्य वितरित करण्याबाबत संख्या ठरवण्यात येते. रेशनकार्ड मध्ये नवीन जोडलेल्या नावांना यानुसारच मिळणाऱ्या लाभाची संख्या देखील वाढवली जाते. नवीन लाभार्थ्यांचा समावेश करून घेण्यासाठी जुन्या लाभार्थ्यांची पडताळणी करणे महत्त्वाचे असल्याचे सरकारच्या निदर्शनात आले. त्यानुसार सरकारकडून अपात्र लाभार्थ्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम 1 एप्रिल 2025 पासून 31 मार्च 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्यात राबवली जाणार आहे. सर्व राज्यभरात अपात्र असणारे लाभार्थी या मोहिमेच्या माध्यमातून वगळले जाणार आहेत. जय लाभार्थी या मोहिमांमध्ये आपले रहिवासी पुरावे सादर करू शकणार नाहीत अशा लाभार्थ्यांची रेशन कार्ड रद्द करण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.

हे वाचा : पीएम किसानच्या 2000 रुपयासाठी शेतकऱ्यांना काढावे लागणार शेतकरी ओळखपत्र.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Wheat Sowing गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

अर्ज आणि कागदपत्रे

रेशनकार्ड अपात्रता तपासणी मोहिमेअंतर्गत रेशन कार्डधारकांना रेशन दुकानदाराकडून एक अर्ज दिला जाणार आहे. या अर्ज मध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरून या अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. या अर्जासोबत रेशनकार्ड धारकांना हमीपत्र देखील जोडावे लागणार आहे. या अर्ज आणि हमीपत्र सोबत अर्जदारांना आपला रहिवाशी पुरावा जोडावा लागणार आहे. रहिवासी पुराव्यामध्ये खालीलपैकी एक कागदपत्र जोडणे आवश्यक आहे:-

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • लँडलाईन फोनचे बिल
  • लाईट बिल
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • गॅस जोडणी क्रमांकाची पावती
  • निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा
  • भाडेपावती
  • इतर रहिवासी पुरावा म्हणून चालणारे कागदपत्र.

अर्जाची तपासणी केली जाणार

अर्ज आणि अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे आपल्या जवळील रेशनकार्ड दुकानांमध्ये जमा करावे लागतील. या अर्जांची क्षत्रिय अधिकाऱ्याकडून तपासणी केली जाईल. यामध्ये रहिवासी पुरावात जोडलेल्या नागरिकांची एक स्वतंत्र यादी तयार केली जाईल. प्रोनोद्री यांची वेगळी यादी तयार करण्यात येईल.

रहिवाशी पुरावा सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत

रहिवासी पुरावा सादर न केलेल्या रेशन कार्डधारकांना रहिवासी पुरावा सादर करण्यासाठी पंधरा दिवसाची मदत वाढ दिली जाईल. पंधरा दिवसानंतर रेशनकार्ड धारकांनी जर आपला रहिवासी प्रवास सादर केला नाही तर अशा रेशनकार्ड धारकांची रेशनकार्ड रद्द केले जाईल. एकाच पत्त्यावर दोन रेशन कार्ड असतील तर त्यापैकी एक रेशनकार्ड रद्द देखील करण्याची तरतूद या मोहिमेमध्ये करण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

अर्ज पीडीएफ

रेशनकार्ड तपासणी मोहिमेअंतर्गत आवश्यक असणारा अर्ज पीडीएफ खाली देण्यात आलेले आहे. ही पीडीएफ डाऊनलोड करून आपण याचे प्रिंट करून यामध्ये माहिती भरून आपल्या जवळील रेशनकार्ड दुकानदाराकडे जमा करू शकता. या अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे देखील जोडणे बंधनकारक आहे.

Leave a comment