ration card tapasani : सरकारने रेशन कार्ड अंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना केवायसी करण्याची याआधी सूचना दिली होती. केवायसी न करणारा लाभार्थ्यांना रेशन कार्ड अंतर्गत मिळणारा लाभ बंद करण्याची शासनाने घोषणा केली होती. आता यातच सरकारने आणखी एक नियम जोडून रेशन अंतर्गत बनावट नोंदी रद्द करण्याबाबत पाऊल उचलले आहे. सरकारने शुक्रवारी एक शासन निर्णय निर्गमित करून राज्यातील रेशन कार्ड धरकांची तपासणी करण्याबाबतची अधिसूचना जाहीर केले आहे.
राज्यात अपात्र रेशन कार्ड शोध मोहिमेची सुरुवात 1 एप्रिल 2025 पासून सुरू केली आहे. ही मोहीम पुढील एक महिन्यापर्यंत राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत विदेशी नागरिकांना जर रेशन कार्ड वितरित करण्यात आले असेल तर ते रद्द करण्यात येणार आहे. यामध्ये केशरी, पांढरे ,पिवळे अशा सर्वच कार्डाचे तपासणी करण्याचे धोरण आखले आहे. जर असे रेशन कार्ड आढळले तर ते रेशन कार्ड तात्काळ रद्द केले जाणार आहे. रेशन कार्ड तपासणी . ration card tapasani

कशी होणार तपासणी ration card tapasani
स्वस्त धान्य दुकानदारांना तपासणी करिता फॉर्म दिले जाणार आहेत. हे फॉर्म रेशन कार्ड धारकाकडून भरून घ्यायचे आहेत. हे फॉर्म भरून घेतल्यानंतर पात्र आणि अपात्र असणाऱ्या रेशन धारकांची यादी स्पष्ट होईल. यामध्ये अपात्र ठरणाऱ्या व्यक्तींचे तात्काळ रेशन रद्द केले जाणार आहे. या फॉर्म सोबतच रेशन कार्ड धारकांना आपला रहिवासी पुरावा देखील जोडणे आवश्यक आहे. आपण जोडत असलेला रहिवासी पुरावा मागील एक वर्षाच्या आतील असणे बंधनकारक आहे.
रेशन कार्ड धारकाकडून आलेली माहिती अन्न व नागरी विभागाकडून तपासणी (ration card tapasani) केली जाईल. यामध्ये ज्या नागरिकांनी वास्तव्याचा पुरावा जोडेल नसेल त्यांना पंधरा दिवसाची मुदत देण्यात येईल. चे नागरिक रहिवासी पुरावा सादर करणार नाहीत त्यांचा रेशन कार्ड रद्द केले जाणार आहे. ज्या नागरिकांना एका कुटुंबातच दोन कार्ड वितरित केले असतील तर त्यापैकी एक कार्ड रद्द केले जाणार आहे.
शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच खाजगी कर्मचारी ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा अधिक असेल अशा कुटुंबांना रेशन कार्ड योजनेतून वगळले जाणार आहे. ज्यांचे उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त आहे असे रेशन कार्ड रद्द केले जाणार आहेत. या मोहिमेच्या अंतर्गत आणि केवायसीच्या माध्यमातून मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नावे यामधून कमी केले जाणार आहेत. ration card tapasani
रेशन कार्ड तपासणी नमुना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.