RuPay Card: लाडक्या बहिणींसाठी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केली मोठी घोषणा…!

RuPay Card : राज्यातील लाडक्या बहिणीसाठी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील अडीच कोटी महिलांना 1500 रुपये अनुदान सोबतच आता रूपे कार्ड (Rupay Card) देखील वितरित करण्यात येणार आहे. अशी घोषणा अदिती तटकरे मॅडम यांनी केली. या कार्डचा वापर हा क्रेडिट कार्ड प्रमाणे करता येणार आहे असे त्या म्हणाल्या तसेच, हे कार्ड काही ठिकाणी वापरण्यावर बंदी असणार आहे असेही म्हणाल्या.

RuPay Card

क्रेडिट कार्ड प्रमाणेच रुपे कार्ड

नाशिक मध्ये महाकवी कालिदास कलामंदिर येथे 8 मे रोजी जिल्हा परिषद आणि जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिलांसाठी वेगवेगळ्या योजनांचा तसेच ई-पिंक रिक्षा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळेस मंत्री अदिती तटकरे मॅडम बोलत असताना म्हणाल्या,लाडकी बहीण योजनेला बळकटी देण्यासाठी राज्यातील लाडक्या बहिणींना रुपे कार्ड (RuPay Card) दिले जाणार आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रसह काही इतर बँकांशी करार करण्यात आलेला आहे.आता महिलांना क्रेडिट कार्ड प्रमाणे रुपे कार्ड वापरता येणार आहे .मात्र, हे कार्ड काही जाग्यावर वापरण्यास बंदी असेल. RuPay Card 

हे वाचा : राज्यातील महिलांना मिळणार आता पिंक ई रिक्षा…

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Wheat Sowing गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

या ठिकाणी वापरता येणार नाही रुपे कार्ड

पात्र असणाऱ्या महिलांना हे रूपे कार्ड (RuPay Card) त्यांच्या गरजेनुसार वापर करतात येणार आहे मात्र,या कार्डसाठी काही बंधन घालण्यात आली आहेत. हे कार्ड तुम्हाला मद्य दुकाने आणि पानटपऱ्यांवर हे कार्ड वापरता येणार नाही, असे अदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केले आहे .

नाशिक विमानतळावर ई-पिंक रिक्षा सेवा लवकरच सुरू

8 मे रोजी झालेल्या कार्यक्रमात महिलांसाठीच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत महिलांना ई-पिंक रिक्षाचे वितरण करण्यात आले. अदिती तटकरे मॅडम यांनी जाहीर केले की, लवकरच नाशिक शहरातील विमानतळावर पिंक रिक्षाची सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. या उपक्रमामुळे महिलांच्या उपजीविकेला हातभार लागणार आहे. RuPay Card 

हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

Leave a comment