संगणक परिचलकांची दिवाळी होणार गोड. sanganak parichalak mandhan.

sanganak parichalak mandhan : राज्य शासनाने ग्रामपंचायत स्तरावर सर्वसामान्य नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी व ऑनलाइन दाखले देण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालकांची नेमणूक केली. या संगणक परिचालकांना कंपनीच्या माध्यमातून नियुक्ती देण्यात आली. परंतु जून 2024 मध्ये या कंपनीची मुदत संपली त्यानंतर राज्य शासनाने नवीन कंपनी देण्याची घोषणा केली. त्यावर राज्य शासनाकडून नवीन कंपनीच्या माध्यमातून या संगणक परिचालकांना नियुक्ती देखील देण्यात आली. परंतु यांचे मागील थकीत मानधन अद्याप पर्यंत करण्यात आले नव्हते. त्यामुळे आता शासकीय आदेशानुसार संगणक परिचालकांना दिवाळीपूर्वी मागील थकीत तीन महिन्याचे मानधन वितरित करणार असल्याची माहिती पंचायत राज विभागाकडून देण्यात आलेली आहे.

sanganak parichalak mandhan किती मिळणार मानधन.

हिंदू धर्मातील दिवाळी हा अत्यंत महत्वाचा सण मानला जातो. या दिवाळी सणपूर्वी संगणक परिचलकांचे थकीत मानधन करावे अशी मागणी राज्य संगणक परिचालक यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. या मागणीला मंजूरी देत दिवाळी पूर्वी संगणक परिचालक यांचे मानधन करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर राबवण्यात येत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
sanganak parichalak mandhan

हे वाचा: आता एटीएम कार्ड नसताना सुरू करा फोनपे

मागील बारा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना सेवा व सुविधा उपलब्ध करून देत असणारे संगणक परिचालकांना सात हजार रुपये एवढे मानधन दिले जात होते. परंतु संगणक परिचालक यांनी केलेल्या विविध आंदोलन व मागण्याच्या आधारे संगणक परिचालकांना प्रति महिना दहा हजार रुपये मानधन देण्याची घोषणा तसेच शासन निर्णय देखील शासनाने निर्गमित केला. या शासन निर्णयाच्या आदेशानुसारच आता संगणक परिचालक यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे दहा हजार रुपये या प्रमाणात मानधन वितरित केले जाणार आहे.

ही प्रक्रिया करावी लागणार.

sanganak parichalak mandhan संगणक परिचालकांना मानधन मिळण्यासाठी त्यांच्या ईआरपी (ERP) लॉगिन मधून इन्व्हाईस करणे आवश्यक आहे. ज्या संगणक परिचालकांनी इन्व्हाईस केले आहे त्या संगणक परिचालकांना हे मानधन वितरित केलं जाणार आहे. त्यामुळे ज्या संगणक परिचालकांनी अद्याप पर्यंत इन्व्हाईस पूर्ण केले नाही त्यांनी इन्व्हाईस करून घ्यावे. अश्या सूचना देखील विभागाकडून करण्यात आली आहे. त्यासोबतच केंद्र चालक यांच्या आयडीवरून इन्व्हाईस केल्यानंतर ग्रामसेवक यांच्या आयडीवरून देखील इन्व्हाईसचे कन्फर्मेशन करणे आवश्यक आहे.

इन्व्हाईस करण्यासाठी संकेतस्थळ

इन्व्हाईस करण्यासाठी जुन्याच आयडी पासवर्ड ने लॉगिन करावे लागेल. या साठी https://mh.gov2egov.com/ या संकेतस्थळावर जाऊन आपले इनवॉइस पूर्ण करून घ्यावे. इनवॉइस करतांना लॉगिन करताना चुकीचा आयडी पासवर्ड चा प्रॉब्लेम येत असेल तर पासवर्ड फोरगेट करून घ्यावा व नंतर नवीन पासवर्ड तयार करून आपले इनवॉइस पूर्ण करून घ्यावे.

Leave a comment