Solar Spray Pump : सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप अनुदान, असा करा अर्ज पहा सविस्तर .

Solar Spray Pump : शेतकरी बांधवांसाठी महाडीबीटी पोर्टलवर शासनाकडून सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 50 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या लेखात आपण आज या योजनेचे फायदे काय, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकेल, अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक लागणारे कागदपत्रे , याची सविस्तर माहिती घेणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Solar Spray Pump सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप साठी 100 टक्के अनुदान या प्रकारच्या बऱ्याच बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप साठी 100 टक्के अनुदान नसून त्या साठी 3000 रुपये किंवा खरेदी किमतीच्या 50 टक्के या पैकी जी रक्कम कमी असेल त्या नुसार शेतकऱ्यांना अनुदान वितरित केले जाते. सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप साठी 100 टक्के अनुदान वितरित केले जात नाही हे लक्षात असू द्या.

Solar Spray Pump

महाडीबीटी पोर्टल म्हणजे काय?

(Solar Spray Pump) शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने महाडीबीटी (MahaDBT) वेब पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे शेतकरी अनेक प्रकारच्या योजनांसाठी अर्ज करू शकतात. यातील काही योजना 100 टक्के अनुदानावर मिळतात.पन सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हे 50 टक्के अनुदानावर दिला जाणार आहे .या योजनेचा अर्ज करून तुम्हाला तुमच्या शेतातील कामे करण्यासाठी सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 50 टक्के अनुदानावर मिळू शकतो .

हे वाचा : महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकारची ड्रोन दीदी योजना.

सौरचलित फवारणी पंपाचा (Solar Spray Pump)फायदा

शेतकऱ्यांना शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी फवारणी पंपाची गरज असते. अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींमुळे हा पंप खरेदी करता येत नाही. त्यामुळे शासन (Solar Spray Pump) 50 टक्के अनुदानावर हा पंप पूरवणार आहे .

सौरचलित फवारणी पंपाचा मुख्य फायदा म्हणजे तो सौरऊर्जेवर चालतो, ज्यामुळे वीजेची गरज लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो आणि शाश्वत उर्जा स्रोताचा वापर होतो.

Solar Spray Pump योजनेसाठी अर्ज कसा करावा?

सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. खालील प्रक्रिया अनुसरा:

  1. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी:
    • प्रथम महाडीबीटी पोर्टलवर नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करा.
    • यासाठी आधार कार्ड, बँक खाते तपशील, आणि शेतजमिनीचे दस्तऐवज आवश्यक असतात.
  2. युजर आयडी व पासवर्ड:
    • नोंदणी पूर्ण केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड तयार होईल.
    • या तपशीलांचा वापर करून पोर्टलवर लॉगिन करा.
  3. योजनेसाठी अर्ज:
    • लॉगिन केल्यानंतर “सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजना” निवडा.
    • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सादर करा.
  4. अर्जाचा तपशील तपासा:
    • अर्ज सादर केल्यानंतर त्याचा स्टेटस नियमित तपासत रहा.
    • अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया कळवली जाईल.

Solar Spray Pump आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. बँक खाते तपशील (पासबुक झेरॉक्स)
  3. 7/12 आणि 8अ उतारे
  4. रहिवासी प्रमाणपत्र
  5. पासपोर्ट आकाराचा फोटो
  6. मोबाईल नंबर

निष्कर्ष

सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजना ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सौरऊर्जेचा वापर करून पंप चालवणे पर्यावरणासाठी लाभदायक आहे, तसेच आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून आणि आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. Solar Spray Pump

1 thought on “Solar Spray Pump : सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप अनुदान, असा करा अर्ज पहा सविस्तर .”

Leave a comment

Close Visit Batmya360