soyabean market मागील काही दिवसापासून सोयाबीनच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आपण पाहत आहोत. दरवर्षीप्रमाणे ज्यावेळेस शेतकऱ्याकडील शेतमाल संपतो त्याचवेळी त्या शेतीमाला भाव आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. बरेच शेतकरी आता या अनुभवातून सावरत आहेत. आपला शेतमाल विक्रीसाठी लगेच न नेता काही दिवस सांभाळून नंतर मार्केटमध्ये विकण्यासाठी घेऊन जातात. अशा शेतकऱ्यांना चांगला दर प्राप्त होतो. राज्यातील प्रमुख शेती पिकातील सोयाबीन हे एक नगदी पीक आहे. या पिकाला देखील बाजारात जास्त प्रमाणात शेतमालाची उपलब्ध झाल्यानंतर शेतमालाला हवा तसा दर मिळत नाही.

एक महिन्यापूर्वी सोयाबीनला 4000 रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणात दर मिळत होता. आता या दरामध्ये सुधारणा होताना पाहायला मिळाली आहे. सोयाबीनचे तर सध्या चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे साठवणूक केली आहे त्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकावी किंवा आणखी थोडे दिवस थांबावे असा प्रश्न शेतकऱ्यांच्य मनात निर्माण झाला आहे. कारण मागील चार दिवसांमध्येच सोयाबीनच्या भावामध्ये 300 रुपयांनी वाढ झाल्याची पाहायला मिळाले आहे. ही सुरू झालेली तेजी शेतकऱ्यांसाठी आशादायक ठरत आहे.
सोयाबीन दर वाढण्याचे कारण soyabean market
सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सोयाबीन पेंडीची मागणी वाढली. नेहमीच आपल्याला माहित आहे की मालाची मागणी वाढली की मालाला दर आपोआपच चांगला मिळतो. त्याचप्रमाणे आता सोयाबीन पेंडीच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सोयाबीन पेंडीच्या मागणीत वाढ झाल्यामुळे सोयाबीनच्या दरात देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोल्ट्री व्यवसाय मध्ये अत्यंत उपयुक्त असणारी सोयाबीन पेंड याची मागणी वाढलेली आहे. पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या नागरिकाकडून सोयाबीन पेंडीची मोठ्या प्रमाणावर मागणी केली जात आहे.
सोयाबीन विकावे की राखून ठेवावे
soyabean market मागील काही दिवसापासून सोयाबीनच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना आपण साठवलेली सोयाबीन बाजारात विकावी अशी अपेक्षा लागली आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची साठवणूक केली आहे त्या शेतकऱ्यांना हा प्रश्न सतावत आहे. बाजार तज्ञांच्या मते सोयाबीनमध्ये आलेली तेजी ही सोयाबीनच्या वाढत्या मागणीमुळे आहे. मागणी जरी वाढत असली तरी मालाचा पुरवठा सद्यस्थितीमध्ये जास्त होणे शक्य दिसत नाही.
पुढील काळात देखील सोयाबीनचे दर वाढताना पाहायला मिळतील. तसेच ज्या शेतकऱ्यांना आपली सोयाबीन बाजारामध्ये विकायला न्यायची आहे. अशा शेतकऱ्यांनी बाजाराचा सविस्तर आढावा घेऊन पुढील निर्णय घ्यावा. बाजाराची सद्य परिस्थिती आणि आढावा यावर लक्ष ठेवून शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विकावा किंवा ठेवावा याबाबत योग्य निर्णय घ्यावा. soyabean market